शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

आता ‘धारावी’ पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:12 IST

प्रत्येक मृत्यूचा अभ्यास करून सुधारणा करा : तपासणी वाढविण्याच्या तीन सदस्यीय केंद्रीय समितीच्या सूचना

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी धारावी पॅटर्नप्रमाणे स्टॅण्डर्ड आॅपरेशन प्रोसेस् (एसओपी) पद्धतीने काम करा, अशा सूचना केंद्रीय समितीने दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव कुणालकुमार, नागपूर येथील एम्स रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद कुशवाह, डॉ. सितिकांता बॅनर्जी यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय केंद्रीय समिती रविवारी जळगावात आली होती. जिल्ह्यातील मृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक मृत्यूची काय कारणे शोधा व त्याचा अभ्यास करा व त्यानुसार कामकाजाची आखणी करून सुधारणा करा, अशा सूचना समितीने दिल्या आहेत.दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक घराची नोंद ठेवण्यासह सारी व इतर आजाराचे रुग्ण समोर येण्यासाठी तपासण्या वाढविण्याच्याही सूचना या समितीने केल्या आहेत. समितीने शहरातील प्रतिबंधित क्षेत्र, कोविड रुग्णालय इत्यादी ठिकाणची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.बेड असिस्टंट म्हणून नातेवाईकांना संधीबाधित रुग्णांजवळील नातेवाईकांचा संचार थांबण्यासाठी बेड असिस्टंटची नियुक्ती करण्यात आली आहे. आता जे रुग्ण दाखल आहे, त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणाला बेड असिस्टंट म्हणून काम करायची तयारी असल्यास त्यांची नियुक्ती केली जाईल, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र यासाठी संपूर्ण सुरक्षिता बाळगणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी नमूद केले.लक्षणे दिसताच तपासणी गरजेचीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसताच स्वत: कोविड रुग्णालयामध्ये जावून कोरोनाची चाचणी करून घेत तात्काळ इलाज करून घेतल्यास मृत्यूदर नक्कीच कमी होवू शकेल, असा विश्वास कुणालकुमार यांनी बैठकी दरम्यान व्यक्त केला. आरोग्य प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर द्यावा व धारावी येथे कोरोना रुग्ण व मृत्यू रोखण्यासाठी अवलंबविण्यात आलेली व्यवस्थापन पद्धत येथेही राबवा, अशा सूचना कुणालकुमार यांनी दिल्या.समितीने दिलेल्या सूचना-तपासणी मोठ्या प्रमाणात वाढवा-कोरोनाबाबत नागरिकांच्या मनातील भीती दूर करा-मास्क वापरणे, हात धुणे इत्यादीबाबत सामाजित जागृती करा-कमी वेळात अहवाल यावा-जनतेशी संवाद वाढवा-प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक घराची नोंद ठेवा-येणाऱ्या अडचणी तसेच रुग्णवाहिकाविषयी व्यवस्थापन करा.जिल्हाधिकाऱ्यांनी समितीपुढे मांडलेले मुद्दे-जिल्ह्यात तपासणीचे प्रमाण वाढविले आहे.-आॅक्सिजन बेडसह यंत्रणा सज्ज-उपाययोजना वाढविल्याने मृत्यूदराचा आलेख खाली-प्रयोगशाळेचा (लॅबचा) केंद्र सरकारच्या योजनेत समावेश करावा-कोरोना रुग्णालयात मोठे बदल केल्याने रुग्णालय सुसज्ज झाले.-चार ते पाच जणांची एकत्रित तपासणी (पूल टेस्टिंग) करणार-६६ डॉक्टर व १५० परिचारिकांची कमतरता 

 

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव