शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता रात्री विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच ॲन्टिजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव थांबता थांबत नाहीये. हा संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव थांबता थांबत नाहीये. हा संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी रात्री ८ वाजेनंतर रस्त्यावर ‍फिरणाऱ्यांची पोलिसांकडून आता रस्त्यावर ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत होती. मंगळवारी रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला.

जिल्ह्यात कोरोना विषाणूने पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. दररोज हजाराच्यावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मृत्यूचे प्रमाणसुध्दा वाढले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी व कुणा बाधिताकडून इतर कुणाला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आता पोलीस व आरोग्य विभागाकडून रात्री लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत विनाकारण ‍फिरणाऱ्यांची रस्त्यावरच ॲन्टिजेन चाचणीस सुरुवात करण्यात आली. त्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या व्यक्तीला लागलीच कोविड केअर सेंटरमध्‍ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.

एसपी उतरले रस्त्यावर....

मंगळवारी रात्रीपासूनच आकाशवाणी चौकात हा उपक्रम सुरू झाला. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी रात्री रस्त्यावर उतरून आकाशवाणी चौकात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने विनाकारण ‍फिरणाऱ्या नागरिकांची ॲन्टिजेन तपासणी केली. तसेच एमआयडीसी पोलिसांनीदेखील रात्री विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी केली.