इनरव्हील क्लब ऑफ ईस्टच्या अध्यक्षपदी निता परमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:18+5:302021-07-16T04:13:18+5:30

जळगाव : इनरव्हील क्लब ऑफ ईस्टच्या अध्यक्षपदी निता राजेश परमार यांची निवड करण्यात आली आहे. नुकताच इनरव्हील क्लबचा पदग्रहण ...

Nita Parmar as President of Inner Wheel Club of East | इनरव्हील क्लब ऑफ ईस्टच्या अध्यक्षपदी निता परमार

इनरव्हील क्लब ऑफ ईस्टच्या अध्यक्षपदी निता परमार

जळगाव : इनरव्हील क्लब ऑफ ईस्टच्या अध्यक्षपदी निता राजेश परमार यांची निवड करण्यात आली आहे. नुकताच इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा पार पडला असून यात मावळत्या अध्यक्षा प्रिती दोषी यांनी नूतन अध्यक्षा नीता परमार यांना पदभार सोपविला आहे.

बुधवारी इनरव्हील क्लब ऑफ ईस्टचा पदग्रहण मीनल लाठी, अश्विनी गुजराथी आणि डॉ.अनुराधा वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थिती आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात नूतन अध्यक्षा निता परमार यांनी नवीन कार्यकारिणीची ओळख करून दिली. उपाध्यक्षा कार्तिकी शाह, सचिव बबिता मंधान, कोषाध्यक्ष दीपा टीपरवाल, आयएसओ दिशा अग्रवाल, भावना चौहान, मार्गदर्शक पूर्व अध्यक्षा संगीता तोतला आणि अध्यक्षा डॉ सुनीता पाटील, तरूणा अग्रवाल, आशा गादिया, ईशा गोयंका, कीर्ती काबरा, ममता चौबे, कविता कराचीवाला आदींनी सदस्यांनी क्लबमध्ये प्रवेश घेतला.

आरोग्याबाबत मार्गदर्शन

कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्या डॉ.अनुराधा वानखेडे यांनी दातांचे होणारे विकार, तसेच त्यामुळे होणारे दुसरे आजाराबाबत माहिती दिली. त्यानंतर अश्विनी गुजराती यांनी, मीनल लाठी यांनी मार्गदर्शन केले. सीमा जाखेटे आणि सुधा काबरा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन शिल्पा चोरडिया यांनी केला व आभार रुची मणियार यांनी मानले.

Web Title: Nita Parmar as President of Inner Wheel Club of East