शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लबतर्फे ११ शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:01 IST

रोटरी क्लबतर्फे ११ शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवार्ड’ प्रदान करण्यात आला.

चोपडा, जि.जळगाव : राष्ट्र घडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांप्रतीचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासह चांगले काम करणाºया शिक्षकांना प्रोत्साहीत करण्याच्या भावनेतून येथील रोटरी क्लबतर्फे ११ शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवार्ड’ प्रदान करण्यात आला. नगरवाचन मंदिरात दि.१९ रोजी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.येथील तहसीलदार अनिल गावीत यांच्या हस्ते व सहप्रांतपाल अभियंता विलास एस.पाटील तसेच चोपडा रोटरी क्लब अध्यक्ष नितीन जैन व मानद सचिव धीरज अग्रवाल, सोहळा प्रकल्प प्रमुख संजीव गुजराथी, नितीन अहिरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्डने सन्मानित करण्यात आले.पुरस्कारार्थी शिक्षक असे- प्रा.डॉ.ए.एल. चौधरी (कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय), मयूरेश सोनवणे (बालमोहन विद्यालय), विजया पाटील (कस्तुरबा विद्यालय), रतन माने (पंकज माध्यमिक विद्यालय), रत्ना पाटील (क्लारा इंग्लिश् मीडियम स्कूल), हेमराज पाटील (विवेकानंद माध्यमिक विद्यालय), दीपाली धनगर (महिला मंडळ माध्यमिक विद्यालय), एन.वाय.मलिक (प्रताप विद्यामंदिर), कलाशिक्षक नरेंद्र पाटील (जय श्री दादाजी हायस्कूल, तांदळवाडी), शरद जगताप (कै.शा.शि.पाटील विद्यालय, चहार्डी) भालचंद्र पवार (सत्रासेन माध्यमिक आश्रमशाळा) या शिक्षकांना शाल, मणिमाळ व गौरवपत्र फ्रेम देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी तहसीलदार अनिल गावीत यांनी मी पण जि.प., नवोदय तसेच आदिवासी आश्रमशाळेतून शिक्षण घेत घडलोय. त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षकांचीही नेशन बिल्डर अवार्ड देऊन गौरव होताना पाहून आनंद होतोय, असं म्हणत उपस्थितांना मार्गदर्शन केले.सत्कारार्र्थींमधून हेमराज पाटील, दीपाली धनगर व एन. वाय. मलिक यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक अध्यक्ष नितीन जैन यांनी, आभार सचिव धीरज अग्रवाल, तर सूत्रसंचालन राधेश्याम पाटील केले.याप्रसंगी प्रा.विलास पी पाटील, एम.डब्ल्यू. पाटील, आशीष गुजराथी प्रफुल्ल गुजराथी, डॉ.वारके, अशोक जैन, धीरेंद्र जैन, विलास कोष्टी, महेंद्र बोरसे, पवन गुजराथी, शिरीष पालीवाल, जितेंद्र बोथरा, निखिल सोनवणे व अनेक रोटरी सदस्य व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकChopdaचोपडा