शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला मुन्नाभाई एमबीबीएस जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

चाळीसगाव : कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना शिरसगाव येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरच्या मुसक्या मंगळवारी बोगस डॉक्टर शोध ...

चाळीसगाव : कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना शिरसगाव येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरच्या मुसक्या मंगळवारी बोगस डॉक्टर शोध समितीने आवळल्या.

मुन्नाभाई एमबीबीएसला जेरबंद करण्यात आले असून मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील बोगस डॉक्टरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, शिरसगाव येथे एका वयोवृद्ध महिलेच्या घरात माधवराव देवराम पंडित हा बोगस डॉक्टर न्यूमोनियासदृश आजारावर औषधोपचार करीत असल्याचे शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर मुश्ताक सय्यद यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार समितीमधील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, आरोग्य विस्तार अधिकारी प्रदीप सोनवणे यांच्यासह दोन शासकीय पंचांनी सापळा लावून छापा टाकला असता माधवराव देवराम पंडित हा रुग्णांवर उपचार करताना आढळून आला. त्याच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची कागदपत्रे मागितली असता, ते आपल्याकडे नाहीत, असे सांगितले. डॉ. देवराम लांडे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.