शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांवर कारवाई सोडून मनपाचा ‘गांधीगिरी’चा स्टंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:25 IST

आवाहनाला केराची टोपली : कारवाईचा इशारा देवूनही भाड्याची रक्कम मिळेना

जळगाव : मनपा प्रशासनाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना थकित भाड्याची रक्कम भरण्यासाठी दहा दिवसांचा अल्टीमेटम दिल्यावरही गाळेधारकांनी थकित रक्कम भरली नाही. त्यामुळे आता शनिवारी मनपाचे अधिकारी महात्मा फुले मार्केटसह इतर मार्केटमध्ये जावून गाळेधारकांना गुलाबपुष्प देवून भाडे भरण्यासाठी ‘गांधीगिरी’चा स्टंट करणार आहेत. सर्वाेच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेश असतानादेखील गाळेधारकांवर कारवाई सोडून मनपाकडून गांधीगिरीचा स्टंंट करण्याचा नेमका उद्देश काय ? असा प्रश्न होत आहे.मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटच्या गाळेधारकांकडे गेल्या सात वर्षांपासून भाड्याची रक्कम थकीत आहे. याबाबत मनपा प्रशासनाने सोमवारी े जाहीर नोटीस देवून गाळेधारकांना दहा दिवसाच्या आत थकीत रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, चार दिवस उलटले तरी एकाही गाळेधारकाने भाड्याची रक्कम भरलेली नाही.आवाहन केल्यावरही थकित रक्कम मिळत नसल्याने शुक्रवारी मनपा आयुक्त उदय टेकाळे यांनी तिन्ही उपायुक्तांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत शनिवारी महात्मा फुले मार्केटमध्ये जावून गाळेधारकांना गुलाबपुष्प देवून थकीत रक्कम देण्याचे आवाहन करण्याचा सूचना आयुक्तांनी दिल्याची माहिती मनपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.कारवाईची हिंमत सोडून, गांधीगिरीची गरजच काय ?मनपाकडून आतापर्यंत अनेकवेळा गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी इशारे देण्यात आले आहे. तत्कालीन प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, चंद्रकांत डांगे यांनीदेखील ही रक्कम भरण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. मात्र, तेव्हाही गाळेधारकांनी थकीत रक्कम भरलीच नव्हती. किशोर राजे निंबाळकरांनी काही बंद गाळे सील करून सहकारी संस्था, सरकारी कार्यालयांकडून २२ कोटींची थकबाकी वसुल केली होती. मात्र, आतापर्यंत थकबाकी वसुल करण्यात मनपाला अपयश आले आहे. मुदत संपलेल्या गाळेधारकांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही मनपा गांधीगिरीचे स्टंट का करत आहे? हे समजण्यापलीकडे आहे.गाळेधारकांचा शासनावर भरोसा कायममनपाकडून देण्यात आलेल्या दहा दिवसांच्या अल्टीमेटमबाबत गाळेधारकांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. गाळेधारकांचा शासनावर भरोसा कायम असून, सोमवारीच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आठवडाभरात गाळेधारकांचा प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले असल्याने जोपर्यंत शासनाचा सकारात्मक निर्णय येत नाही, तोवर भाडे न भरण्याची भूमिका गाळेधारकांची आहे. तसेच शासनाने मनपा अधिनियमात केलेल्या बदलावर दाखल केलेल्या हरकतींबाबत काय निर्णय होतो, याकडेही गाळेधारकांचे लक्ष लागले असल्याने गाळेधारक मनपाच्या इशाऱ्याला जुमानतील, असे सध्या तरी चित्र दिसून येत नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव