शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या स्वास्थ्यासाठी मुक्ताईनगरच्या आमदारांनी उघडले मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 23:01 IST

व्हिडीओ झाला व्हायरल : पूजा व आरतीही केली

बोदवड : कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद असताना बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाळा हनुमान मंदिर हे गुरुवारी उघडून तेथे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चक्क होम हवन व पुजा तसेच आरतीही केली. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच चर्चा होत असून नियम केवळ सर्वसामान्याच का? आमदारांंनी नियमभंग केल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे कोरोनामुक्त व्हावे यासाठी बोदवड तालुकायतील शिरसाळा मारोती मंदिरात मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, गोपाळ सोनवणे, महेंद्र मोंढळे व इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी या मंदिरात पूजा केली असा हा व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले आहेत.नियम मोडला नाही - आमदार पाटीलयाबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, मंदिराच्या पटांगणात मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी हनुमंताला साकडे घालत होम व आरती केली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन केले आहे, तर काही करीकर्त्यांनी ते फोटो काढले असून जो व्हिडीओ व फोटो व्हायरल होत आहे तो जुना आहे. मात्र निव्वळ राजकारणासाठी सर्व काही सुरू असल्याचेही ते म्हणाले.कार्यकर्ते म्हणतात मंदिरात फक्त आम्हीयाबाबत कार्यकत्यार्नी फक्त आम्ही मंदिरात पूजा केली परंतु आमदार साहेब होते असे म्हटले आहे. दरम्यान एकीक सर्वसामान्य जनतेला मंदिर दर्शन बंद असताना आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मंदिर उघडे केले जात असल्याने सोशीलमीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.