शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय बहुजन कर्मचारी महासंघाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

यावल : येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने आरक्षण बचाओ लोकतंत्र बचाओ या मागणीसाठी एक दिवसीय ...

यावल : येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने आरक्षण बचाओ लोकतंत्र बचाओ या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनास राज्यातील ११ संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

संघटनेच्यावतीने नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी, सरकारी, निम सरकारी व शासकीय आणि सार्वजनिक सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण रोखण्याच्या धोरणाच्या विरोधात दिनांक १८ फेब्रवारी २०२१ ते २० एप्रिल २o२१ व ७ मे २०२१च्या शासन निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणविरोधी धोरणाच्या विरोधात, सार्वजनिक उपक्रमातील आस्थापनेमध्ये नियमाप्रमाणे बिंदुनामावली अद्ययावत न करता व अनुशेष भरती न करता होणाऱ्या नियमबाह्य भरती प्रक्रियेच्या विरोधात व ओबीसी प्रवर्गास पदोन्नतीतील आरक्षण लागू न करणे आदी निर्णयांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे आनंद जाधव व मनोज तायडे यांनी केले. या आंदोलनास प्रोटान संघटनेचे बी. बी. सुरवाडे, महेंद्र तायडे, प्रभा तायडे, भारत मुक्ती मोर्चाचे पंकज तायडे, पंकज डांबरे, बबलू गजरे, स्वप्नील पारधे, मंथन महिरे, भीम आर्मीचे नीलेश सपकाळे, आकास सुरवाडे, अतुल पारधे, आकाश बिऱ्हाडे यांच्यासह चेतन गजरे, भूषण बागुल ऑल इंडिया दलित पँथर सेनेचे भूषण साळुंखे, योगेश भालेराव, अमोल भालेराव, राष्ट्रीय किसान मोर्चाचे कुंदन तायडे, भीमराव साळवे, अमर कोळी, भारतीय युवा बेरोजगार मोर्चाचे ज्ञानदेव भालेराव, सागर बहारे, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे संतोष तायडे, वैभव सोनवणे, चेतन भालेराव, रोहन निकम, हर्षल गजरे, पंकज डांबरे, पंकज तायडे, बबलू गजरे आदींनी सहभाग नोंदवला.