शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

यंदा रस्ते विकासासाठी सर्वाधिक निधी प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा वार्षिक योजनांमधून करण्यात येणाऱ्या विविध विभागांच्या कामांसाठी प्रारूप आराखडा तयार झाला असून, यामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा वार्षिक योजनांमधून करण्यात येणाऱ्या विविध विभागांच्या कामांसाठी प्रारूप आराखडा तयार झाला असून, यामध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सर्वाधिक पाच हजार ६९३ कोटी पाच लाख रुपयांचे नियतव्यय रस्ते विकासासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

मावळत्या आर्थिक वर्षाचा अनुभव पाहता, आरोग्य विभागासाठी मोठा खर्च झाला असला तरी आगामी वर्षासाठी आरोग्य विभागाचे नियतव्यय तिसऱ्या स्थानी आहे. या विभागासाठी तीन हजार ९१० कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे.

जिल्हा नियोजन समितीचा (सर्वसाधारण) २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा मंजूर नियतव्यय ३७५ कोटी रुपयांचा होता. मात्र, गेल्या वर्षी कोरोनामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांसाठीच्या निधीला कात्री लागली व जिल्ह्यासाठीच्या निधीत ६७ टक्के कपात करण्यात आली. जो ३३ टक्के निधी मिळणार, त्यातही कोरोनासाठी राखीव निधी ठेवण्यात आला. त्यानंतर यंदा तर २०२१-२२ या वर्षासाठी अंमलबजावणी यंत्रणांनी ५२५ कोटी १६ लाख १४ हजार रुपयांचा आराखडा प्रस्तावित केला आहे.

‘आरोग्य’ अजूनही तिसऱ्या स्थानी

केंद्रीय अर्थसंकल्प असो की, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा अर्थसंकल्प असो; आर्थिक तरतुदीमध्ये आरोग्य विभागाच्या उपाययोजनांसाठी निधीची तरतूद ही कमीच राहते, हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. मात्र, गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला आणि सर्व कामांचा निधी रोखण्यात येऊन केवळ कोरोना उपाययोजनांसाठी अर्थात आरोग्य विभागासाठी निधी खर्च करण्याचे निर्देश राज्यभर देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याला मिळालेल्या ३३ टक्के अर्थात १२३ कोटी रुपयांच्या निधीतून आरोग्यासाठी ४२ कोटींचा निधी खर्च झाला. हा अनुभव पाहता, यंदा आरोग्य विभागासाठी सर्वांत जास्त तरतूद राहण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, यंदाचा जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारूप आराखडा पाहता, आरोग्य विभाग तिसऱ्या स्थानी आहे.

गेल्या वर्षी कामे थांबल्याने ‘रस्ते विकास’ वाढला

गेल्या वर्षी ज्या कामांना मंजुरी दिली आहे, तेवढीच कामे करावी व नवीन कामांना मंजुरी न देण्याचे निर्देश असल्याने जिल्ह्यातील रस्त्यांसह सर्वच विकासकामे थांबली होती. यंदा रस्त्यांच्या कामांसाठी तसेच इतरही कामांना निधी मिळणार असल्याने रस्तेविकासासाठी पाच हजार ६९३ कोटी पाच लाख रुपयांचे नियतव्यय प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासोबतच लघुपाटबंधारे विभागासाठी चार हजार ७२० कोटी २७ लाख रुपयांचे नियतव्यय प्रस्तावित आहे.