शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरटय़ांनी घेतला युवकाचा बळी

By admin | Updated: March 6, 2017 01:19 IST

जळगाव रेल्वे स्टेशनजवळील घटना : धावत्या रेल्वेतून ओढले, तिकीट तपासनिसाचा पोबारा

जळगाव : रेल्वे प्रवाशांचा मोबाइल लांबविणा:या चोरटय़ांनी रविवारी संध्याकाळी नरेश चंद्रप्रकाश जैस्वाल (22, रा. पैठणगेट, औरंगाबाद) या विद्याथ्र्याचा बळी घेतला. जळगाव रेल्वेस्टेशनजवळ नरेशच्या हातातील मोबाइल रेल्वेबाहेरच्या एका चोरटय़ाने ओढण्याचा प्रय} केला. त्यात रुळावर पडून नरेशचा मृत्यू झाला. नरेश जैस्वाल व अपूर्व जानबा हे  ग्वाल्हेर येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहेत. सोमवारपासून परीक्षा सुरू होणार असल्याने हे दोघेही सचखंड एक्सप्रेसने  ग्वाल्हेरला जाण्यासाठी औरंगाबाद येथून बसले. ही गाडी जळगावहून  निघाली असता नरेश मोबाइलवर  बोलण्यासाठी डब्याच्या दरवाजाजवळ गेला. तेवढय़ात रेल्वेच्या बाहेरून कोणीतरी त्याच्या हातातील मोबाइल ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र यात नरेशच खाली ओढला जाऊन  रेल्वेखाली आला. अपूर्व याने साखळी ओढली आणि तिकीट तपासनीस व काही लोकांना नरेशला रुग्णालयात हलविण्याची विनंती केली. तो बॅग परत घेऊन घटनास्थळी येईर्पयत  तिकीट तपासनीस गायब झाला होता. इतर काही नागरिकांनी रेल्वे पोलिसांना कळवून रुग्णवाहिकेद्वारे नरेशला जिल्हा रुग्णालयात हलविले. आठवडाभरापूर्वी अशाचप्रकारे एक प्रवासी खाली पडून जखमी झाला होता. शिरसोली रेल्वे स्थानकावर रुळात अडकलेल्या पायावरून रेल्वे गेल्याने जगदीश चंद्रभान पवार (35, रा. कढोली, ता. एरंडोल) या मजुरी काम करणा:या तरुणाचा उजवा पाय कापला गेला. तो शिरसोली येथे लग्नाला गेलेला होता.  रेल्वे रूळ ओलांडत असतानाच नेमक्या बदलल्या जाणा:या रुळाच्या सांध्यांमध्ये त्याचा पाय अडकला.  रेल्वेच्या कर्मचा:यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. चाळीसगावचा            तरुण गंभीरचाळीसगाव येथून काशी एक्सप्रेसने जळगावला येत असताना परवेज उर्फ मुन्ना शेख (26, रा. चाळीसगाव) हा  तरुण रेल्वेतून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला.   प्रकृती गंभीर असल्याने त्यास खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.