शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीसाठी लाखोंचा खर्च अन् दारू विक्रीसाठीही खटपट

By admin | Updated: April 8, 2017 18:43 IST

व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे जिल्ह्यात एरंडोल व जळगाव येथे व्यसनमुक्ती केंद्रांना दरवर्षी 20 लाख रुपये अनुदान दिले जाते.

शासनाचा अजब कारभार : दुटप्पी भूमिकेबाबत आश्चर्यजळगाव : व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे जिल्ह्यात एरंडोल व जळगाव येथे व्यसनमुक्ती केंद्रांना दरवर्षी 20 लाख रुपये अनुदान दिले जाते. तर दुस:या बाजूला शासनाने दारू विक्रीपोटी महसूल मिळावा, उत्पन्न सुरू रहावे यासाठी सहा रस्त्यांची मालकी बदल करून एकप्रकारे दारू विक्रीला प्रोत्साहन दिले असल्याचा सूर शहरासह जिल्हाभरातून उमटत आहे. जि.प.तर्फे गेल्या सात वर्षापासून जिल्ह्यातील दोन व्यसनमुक्ती केंद्रांना अनुदान दिले जाते. मागील दोन वर्षापासून अनुदान केंद्राकडून आलेले नाही. त्यात खंड पडला, पण ते मिळेल हे निश्चित आहे. या केंद्रातील लाभार्थी, कर्मचारी, अधिकारी, मार्गदर्शक यांचे वेतन आदीसाठी खर्च गृहीत धरून हे अनुदान केंद्रातर्फे जि.प.च्या माध्यमातून दिले जाते. जळगाव व एरंडोल येथे  जवळपास 400 जण व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. दारूचे व्यसन सोडून पुन्हा कुटुंब, समाज यांच्यासाठी योगदान द्यावे, सामाजिक स्वास्थ टिकावे, असा उद्देश यामागे आहे. अर्थातच समाज व्यसनमुक्त व्हावा यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. मागील दोन वर्षाचे अनुदान मिळालेले नसले तरी ही केंद्र सुरू आहे. केंद्राकडे त्यासंबंधीचा प्रस्ताव दिल्याचे जि.प.च्या समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले. टिकेचा सूरबियरबार, देशी दारूच्या दुकानांना अडसर ठरलेला राज्यमार्ग, महामार्ग यांचा अडसर दूर व्हावा यासाठी शासानाने सहा रस्त्यांची मालकी बदलली आहे. त्यांना महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करून बियरबार पुन्हा सुरू होतील व त्यातून उत्पन्न मिळेल, असा अजेंडा यामागे असल्याचे दिसते. शासन एकीकडे दारूला प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यांची मालकी बदल करुन खटपट करते तर दुसरीकडे व्यसनमुक्तीसाठी जि.प.च्या माध्यमातून रग्गड अनुदान देते व सामाजिक स्वास्थ्याचा मुद्दाही सांगितला जातो.. शासनाच्या या दुटप्पी भूमिकांबाबत ग्रामस्थ, नागरिक यांच्यात संभ्रम व टिकेचा सूरही व्यक्त होत आहे.