शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

खंडेराव नगर परिसरात भरला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना म्हणून आठवडी बाजारांना बंदी घातली आहे. मात्र, प्रशासनाच्या या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना म्हणून आठवडी बाजारांना बंदी घातली आहे. मात्र, प्रशासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत शनिवारी खंडेराव नगर परिसरात भाजीपाला विक्रेत्यांनी बाजार भरविला होता. विशेष म्हणजे, बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापरचं केलेला नसल्याचे पहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडालेला होता.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत आहे. त्याचबरोबर कोरोना बाधित रूग्णांची संख्‍या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अनेक बाबींना प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यात आठवडी बाजारांचाही समावेश आहे. मात्र, शहरात आठवडी बाजार भरली जात असल्याचे चित्र दर आठवड्याला पहायला मिळत आहे. शनिवारी खंडेराव नगर परिसरात सुध्दा सायंकाळी आठवडी बाजार भरला होता. खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी याठिकाणी झाली होती. बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापर केलेला नव्हता. तसेच कुठलेही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. एकीकडे प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न होत असताना, काही नागरिकांकडून मात्र, त्या उलट केले जात आहे.