शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ाच्या सूनबाईची मराठी चित्रपट निर्मिती

By admin | Updated: November 20, 2014 13:32 IST

खान्देशच्या कलावंतांनी मराठी चित्रनगरीत आपल्या अभिनयाची छाप उमटवित, धुळ्य़ाच्या सूनबाई लीना सुधीर देवरे यांनी 'विटीदांडू' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 धुळे : खान्देशच्या कलावंतांनी मराठी चित्रनगरीत आपल्या अभिनयाची छाप उमटवित, धुळ्य़ाच्या सूनबाई लीना सुधीर देवरे यांनी 'विटीदांडू' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. २१ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.विटीदांडू या चित्रपटाची निर्मिती लीना देवरे यांनी केली आहे. त्या धुळे महापालिकेचे सभागृह नेते कमलेश देवरे यांच्या वहिनी आहेत. शहरातीलच बालकलावंत राधिका देवरे हिनेही चित्रपटात भूमिका केली आहे, तर कापडणे येथील ऋषीकेश पाटील कार्यकारी निर्माते आहेत. अभिनेत्री मृणाल ठाकूर या शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील रहिवासी आहेत. खान्देशच्या कलावंतांनी व्यावसायिक पातळीवर केलेला हा अनोखा प्रयोग आहे.हिंदी चित्रपट अभिनेते अजय देवगण हा चित्रपट आपल्या अजय देवगण फिल्म्स संस्थेच्या बॅनरखाली प्रदर्शित करीत आहेत. प्रसिद्ध कलावंतांची भूमिकाया चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, रवींद्र मंकणी, अशोक सर्मथ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. श्रीरंग गोडबोले, मानवेल गायकवाड, ऋषीकेश परांजपे यांनी गीते लिहिली आहेत, तर शंकर महादेवन, सुनिधी चौहान, मानवेल गायकवाड, मेघना मिश्रा, उदेश उमप यांनी गीते गायली आहेत. या चित्रपटाची कहाणी महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन व आजोबा-नातूच्या हळव्या संबंधांवर आधारलेली आहे. गहन व रोमांचक कथा, स्वातंत्र्य युद्धाच्या रक्तरंजित पार्श्‍वभूमीवर चित्रित करण्यात आलेली आहे. भाव, भावनांचे संबंध रेखाटणारा जिवंत कलाकृतीतून अनोखा संदेश देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या सेलीब्रेशनसाठी अभिनेते अशोक सर्मथ, अभिनेत्री मृणाल ठाकरे व निर्मात्या लीना देवरे हे पुढील आठवड्यात धुळे येथे येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सभागृह नेते कमलेश देवरे यांनी दिली.