शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गावात कुपोषण, शहरांत अतिपोषण; कोरोनाकाळात मुलांचे वजन वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST

जळगाव : जिल्ह्यात एकीकडे ग्रामीण भागात अचानक कुपोषित बालकांची संख्या तीन ते चार पटीने वाढल्याचे समोर आले आहे. त्यातच ...

जळगाव : जिल्ह्यात एकीकडे ग्रामीण भागात अचानक कुपोषित बालकांची संख्या तीन ते चार पटीने वाढल्याचे समोर आले आहे. त्यातच शहरात मात्र, अतिपोषण अर्थात कोविडच्या काळात मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे. कोविडच्या काळात टीव्ही आणि मोबाईलसमोरच अधिक वेळ जात असल्याने मुलांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

स्थूलपणावर वेळेवर नियंत्रण मिळविले नाही तर रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार यातून उद्भवू शकतात. शिवाय कोविड काळात स्थूलपणा धोकादायी ठरू शकतो हे पहिल्या व दुसऱ्या लाटेत समोर आले आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होऊ शकतात, असा एक अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. त्या दृष्टीने पालकांनीही लहान मुलांच्या आरेाग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील कुपोषित बालके

तीव्र कुपोषित -१३४५

मध्यम कुपोषित - ६२०२

शहरांत स्थूलता ही नवी समस्या

शहरात लहान मुलांमधील स्थूलता ही नवीन समस्या समोर येत आहेत. शारीरिक श्रम कमी असणे यासह गोड, मैद्याचे, बाहेरचे तेलगट, तुपकट खाणे, पोष्टिक आहार न घेणे या बाबींमुळे ही समस्या समोर येत आहे. याचे रूपांतर पुढे चालून रक्तदाब आणि मधुमेहात होत आहे. याची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कारणे काय?

कोविडमुळे लहान मुले सध्या घरातच बसून आहेत. त्यांचे खेळणे, बागडणे शारीरिक हालचाली अतिशय कमी झाल्या आहेत. त्यातच जेवताना टीव्हीसमोर बसून जेवणे, मोबाईल पाहता पाहता जेवणे, शिवाय पूर्ण वेळ घरात राहत असल्याने सारखे खात राहणे या बाबींमुळे लहान मुलांमध्ये वजनवाढीची समस्या या कोविड काळात उद्भवली असल्याचे बालरोगतज्ञ सांगतात.

स्थूलपणामुळे कोविडमध्ये धोका

अतिस्थूलपणा असलेल्यांना रक्तदाब आणि मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. लहान मुलांमध्ये स्थूलपणा वाढत असल्याने त्यांना हा धोका अधिक आहे. त्यातच १८ वर्षांखालील मुलांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झालेले नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेत या मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच स्थूल व्यक्तींना कोविडचा संसर्ग झाल्यास त्यांची प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.

कोट

कोविड काळात घरातच बसून असल्याने व शारीरिक हालचाली कमी असल्याने लहान मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे. यासाठी घरातच काही व्यायाम करावे, त्यात पायऱ्या चढउतार करणे, दोरीच्या उड्या, चालणे, आदी यासह पोष्टिक आहार घ्यावा, साखर, मैदा, तेलगट व तूपकट चरबीयुक्त अन्न कमी असावे, लहान मुलांनी टीव्हीसमोर बसून जेवणे बंद करावे किंवा जेवताना मोबाईल पाहू नये. - डॉ. दीपक अटल, बालरोगतज्ञ