शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेच्या खूनप्रकरणी जन्मठेप

By admin | Updated: October 8, 2014 11:45 IST

नयना प्रल्हाद कोळी या बालिकेचा खून केल्या प्रकरणातील आरोपी जीवन उर्फ देवेंद्र नथू चालसे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी. दात्ये यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

जळगाव : रावेर तालुक्यातील रणगाव रस्त्यावर शौचालयास गेलेल्या नयना प्रल्हाद कोळी (वय-९) या बालिकेचा खून केल्या प्रकरणातील आरोपी जीवन उर्फ देवेंद्र नथू चालसे (रा.फैजपूर, ता.यावल) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी. दात्ये यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

रावेर तालुक्यातील रणगाव येथील सुनील संपत कोळी यांनी फिर्याद दिली आहे. ४ एप्रिल २0१0 रोजी फिर्यादीची मुलगी निकिता, पुतणी काजल व नयना प्रल्हाद कोळी या दुपारी दोन वाजेच्या सुमारास रणगाव रस्त्यावर शौचासाठी गेल्या होत्या. यादरम्यान आरोपी जीवन उर्फ देवेंद्र नथू चालसे हा याठिकाणी दुचाकीवरून आला होता. याठिकाणी थांबून त्याने या तिन्ही मुलींना हटकले होते. या वेळी एक मुलगी हसली होती. याचा राग आल्याने आरोपी जीवन याने निकिता हिला पकडले. मात्र तिने झटका मारून पळ काढला. त्यानंतर आरोपीने नयना हिच्या पोटात चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने नयनाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही मुली बस स्टॅण्डजवळ ओरडत आल्या. तेथे फिर्यादीला झालेला प्रकार सांगितल्यानंतर सर्व जण घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३0२ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. आरोपीने रावेर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी वाय.एल. मेश्राम यांच्याकडे कबुली जबाब दिला होता. त्यात आरोपीने अमोल दीपक कोळपकर (रा.शिंदखेडा) याने आपल्याला फोन करून पत्नीबाबत अपशब्द बोलल्याचे सांगितले होते. त्यामुळे बेचैन होऊन आपल्याला दोन दिवस झोप लागली नाही. डोके शांत करण्यासाठी आपण रणगावकडून जात असताना ही घटना घडल्याचे त्याने सांगितले होते. या खटल्याचे कामकाज न्या.एम.बी. दात्ये यांच्या कोर्टात झाले. सरकारी वकील टी.डी. पाटील यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपी जीवन चालसे याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 
दोन खून दोन वेळा जन्मठेप
आरोपी हा नयनाचा खून करून शिंदखेडा येथे गेला होता. तेथे त्याने अमोल दीपक कोळपकर याचा खून केला होता. त्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. नयना कोळी या बालिकेच्या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.