शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीत राहू, पण मेहनत करूनच खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST

असाच प्रामाणिकपणाचा प्रत्यय अमळनेर शहरातील एका गरीब माठ विक्रेत्या दाम्पत्यांकडून आला असून या दोघांनी पत्नीस सापडलेले रोख रकमेचे पाकीट ...

असाच प्रामाणिकपणाचा प्रत्यय अमळनेर शहरातील एका गरीब माठ विक्रेत्या दाम्पत्यांकडून आला असून या दोघांनी पत्नीस सापडलेले रोख रकमेचे पाकीट स्वतः संबंधित व्यक्तीपर्यंत स्वतः पोहोचवले.

विशेष म्हणजे पाकीट परत केल्यानंतर त्या मोबदल्यात मिळत असलेले बक्षीसदेखील नाकारून पैशांची नसली तरी आपली मनाची श्रीमंती त्यांनी सिद्ध केली आहे. सुनीता रविकांत महाजन व रविकांत छोटू महाजन (अमलेश्वर नगर, माळीवाडा) असे या प्रामाणिक दाम्पत्याचे नाव असून पती व पत्नी दोघे दररोज डोक्यावर माठ घेत शहरात फेरी करून विक्रीचा व्यवसाय करतात. तीन दिवसांपूर्वी अमळनेर शहरातील नावीन्य पॅथॉलॉजी लॅबचे पॅथॉलॉजिस्ट शरद शेवाळे हे सकाळीच दुचाकीने आपल्या लॅबकडे जात असताना विद्याविहार कॉलनीजवळ त्यांच्या खिशातील पैशांचे पाकीट नकळत खाली पडले.

हे पाकीट माठ विक्रीसाठी जात असलेल्या सुनीता महाजन यांच्या नजरेस पडले. त्यांनी ते उचलून थोडा वेळ त्याच ठिकाणी थांबून कुणाचे पडलेय का? यासाठी वाट पाहिली. मात्र २५ मिनिो कुणीच न आल्याने त्यांनी ते पाकीट स्वतःजवळ ठेवून माठविक्री करून घरी गेल्या. इकडे शेवाळे यांना पाकीट गेल्याचे समजल्यावर तेही परेशान झाले होते. त्यांनी शोधही घेतला, पण मिळाले नाही. पाकिटात ५ ते ६ हजार रोकड शिवाय दोन एटीएम, ड्रायव्हिंग लायसन्स व्यतिरिक्त इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. दुपारी सुनीता यांनी हे पाकीट पतीराज घरी आल्यानंतर त्यांना दाखवले. दोघांनीही हे पाकीट संबंधित व्यक्तीस परत करण्याचा निश्चय केला.

पाकिटातील लायसनवरून शेवाळे यांचे नाव व मोबाइल नंबर काढून त्यांना फोन करत तुमचे पाकीट आम्हाला सापडल्याचे सांगून त्यांना सुखद असा धक्का दिला. एवढेच नाही तर स्वतः दोन्ही पती व पत्नी त्यांच्या नावीन्य लॅबला येऊन जसेच्या तसे पाकीट त्यांनी परत केले. विशेष म्हणजे देऊ केलेले बक्षीसदेखील न घेतल्याने शरद शेवाळे व त्यांच्या पत्नी वैशाली शेवाळे यांनी या प्रामाणिक दाम्पत्याचा विशेष असा सत्कार करून कौतुक व आभार व्यक्त केले.