५७ पक्के अतिक्रमीत बांधकाम केले जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:16 PM2019-11-20T22:16:35+5:302019-11-20T22:16:51+5:30

जळगाव : शहरातील शाहूनगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारींवर अतिक्रमण केलेल्या ५७ पक्कया बांधकामावर मनपाकडून जेसीबी चालविण्यात आला. या ...

 Landowner constructed on 5 acres of encroachment | ५७ पक्के अतिक्रमीत बांधकाम केले जमीनदोस्त

५७ पक्के अतिक्रमीत बांधकाम केले जमीनदोस्त

Next

जळगाव : शहरातील शाहूनगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारींवर अतिक्रमण केलेल्या ५७ पक्कया बांधकामावर मनपाकडून जेसीबी चालविण्यात आला. या भागातील रस्त्यालगतच्या गटारींवर सुमारे १५० हून नागरिकांनी शौचालय, ओट्यांचे बांधकाम करून ठेवले आहे. याबाबत मनपाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात मनपाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी मनपा कर्मचारी व रहिवाश्यांमध्ये किरकोळ वाद देखील झाले.
शाहूनगर येथील पोलिस चौकी ते ट्रॅफीक गार्डन रस्त्यालगत गेल्या पंधरा वर्षांपासून हे अतिक्रमण कायम असल्याने रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी व रस्ता अरुंद झाला होता. अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांच्या नेतृत्वाखाली जोरदार कारवाई करण्यात आली.
उपायुक्तांनी केली पाहणी
मनपा उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास अतिक्रमण कारवाईचा आढावा घेतला. त्यानंतर शाहू नगर भागात जावून अतिक्रमणाची पाहणी देखील केली. दरम्यान, कारवाईदरम्यान काही रहिवाश्यांनी मनपा कर्मचाऱ्यांशी वाद घातला. आधी रस्त्यांची दुरुस्ती करा त्यानंतर अतिक्रमण काढा असा संताप स्थानिक नागरिकांनी केला. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला. मनपाने अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी वाद उदभवू नये म्हणून तगडा पोलिस बंदोबस्त घेतला होता. त्यानुसार १ पोलिस अधिकारी, पाच पुरुष पोलिस कर्मचारी, पाच महिला पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त कारवाई प्रसंगी होता. बुधवारी देखील या भागात कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती एच.एम.खान यांनी दिली.

गटारींवर बांधकाम करून रस्त्यावर केले होते अतिक्रमण
या भागात गटारीवर नागरिकांनी थेट शौचालय, ओटे, जिन्यांचे पक्के बांधकाम केल्याचे पहायला मिळाले. काही जणांनी तर गटारींच्या पुढे असलेल्या रस्त्यावरही तीन ते चार फुटांचे अतिक्रमण केल्याचे आढळून आले. गटारींवर अतिक्रमण केल्यामुळे गटार देखील काढता येत नाही. पावसाळ्यात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. दुर्गंधीमुळे आजारांचेही प्रमाण वाढत असते.

Web Title:  Landowner constructed on 5 acres of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.