शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
6
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
7
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
8
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
9
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
10
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
11
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
12
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
13
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
14
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
15
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
16
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
17
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
18
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
19
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
20
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
Daily Top 2Weekly Top 5

वाळू चढविताना तोल गेल्याने आठव्या मजल्यावरून मशीनसह पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : मशीनच्या साहाय्याने वाळू वर चढवीत असताना तोल गेल्याने मशीनसह आठव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा जागीच मृत्यू झाला. ...

जळगाव : मशीनच्या साहाय्याने वाळू वर चढवीत असताना तोल गेल्याने मशीनसह आठव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलीस वसाहतीत घडली़ मोहनलाल मुन्नीलाल (रा. झाशी) असे मयत मजुराचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातील पोलीस वसाहतीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी घरांचे काम सुरू आहे. या ठिकाणी परराज्यातील शेकडो मजूर घर बांधण्याचे काम करीत आहेत. शुक्रवारी दुपारी मोहनलाल मुन्नीलाल हा मजूर आठव्या मजल्यावर एकटा मशीनच्या साहाय्याने वाळू चढवीत होता. वाळू चढवीत असताना मशीनचा तोल जाऊ नये म्हणून तिच्या खालच्या बाजूला असलेल्या अँगलवर वाळूच्या गोण्या ठेवल्या होत्या. दरम्यान, मोहनलाल हा त्या वाळूच्या गोणी बाजूला करून मशीनच्या साहाय्याने एकटाच वाळू वर चढवीत होता. त्याचवेळी अचानक तोल जाऊन मोहनलाल हा आठव्या मजल्यावरून खाली कोसळला.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू

आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्यामुळे मोहनलाल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मजुराचा पडून मृत्यू झाल्याचे कळताच, बांधकाम ठेकेदारासह इतर कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

डीवायएसपींसह पोलिस निरीक्षकांनी केली पाहणी

सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे, पोलीस कर्मचारी करुणासागर जाधव, संजय पवार, आरपीआय सुभाष सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत घटनेची माहिती जाणून घेतली. त्यामुळे घटनास्थळी मजुरांची गर्दी झाली होती.

महिला बालंबाल बचावल्या...

मोहनलाल हा एकटाच आठव्या मजल्यावर वाळू चढविण्याचे काम करीत होता. दरम्यान, खाली काही महिला मजूर आपल्या मुलांसह बसल्या होत्या. त्यांच्यासमोरच आठव्या मजल्यावरून अवजड मशीन थेट खाली कोसळल्याने चिमुकले व त्या महिला बालंबाल बचावल्या, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. वरच्या मजल्यावरून मशीन पडल्याने मशीनचे तुकडे-तुकडे झाले.