शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

कोजागरी : उपवास, पूजन व जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:37 IST

कोजागरी किंवा शरद पौर्णिमा ही अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा. शरद ऋतूमध्ये पौर्णिमा येत असल्याने तिला शरद पौर्णिमाही म्हणतात. या ...

कोजागरी किंवा शरद पौर्णिमा ही अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा. शरद ऋतूमध्ये पौर्णिमा येत असल्याने तिला शरद पौर्णिमाही म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मी पृथ्वीतलावर उतरते आणि मध्यरात्री को जागरती... असे विचारत असते. ती पाहते की कोण कोण जागा आहे म्हणजे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे. वामन पुराणात दीपदान जागर असे म्हटले आहे या दिवशी बळीराजाची देखील पूजा करतात. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. तसेच रात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपवास, पूजन व जागरण या तिन्ही गोष्टी या व्रतात समाविष्ट आहेत. पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी आप्तेष्टांना दिले जाते. चंद्राला आटवलेल्या दूधाचा नैवेद्य दाखवतात. ब्रह्म पुराणात या व्रताची कथा थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडून स्वच्छता करून घरे सुशोभित करावी, गृहदाराजवळ अग्नि प्रज्वलित करून त्याची पूजा करावी पृथ्वीची पूजा करून त्याला दूध खिरीचा नैवैद्य दाखवावा यादिवशी आटवलेल्या दुधात केशर पिस्ता, बदाम, वेलदोडे, जायफळ, साखर घालून लक्ष्मीदेवीला नैवद्य अर्पण करतात. दुधामध्ये मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडतात. मग ते दूध प्राशन करतात. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांसाठी हे औषध खिरी मध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवले जातात. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो, असे मानले जाते इतर राज्यांमध्ये सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो. श्रीलक्ष्मीची सेवा करण्याचा हा एक उत्तम योग आहे. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. जसे वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी लक्ष्मी, भाग्य लक्ष्मी... अशी सर्वच प्रकारची लक्ष्मी ही जागृत माणसाला मिळते. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, सर्वांचे हित करणारी आहे म्हणून या पौर्णिमेला जास्त महत्व आहे. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र्रसुुद्धा पृथ्वीवर फिरत असतो व तोसुद्धा विचारत असतो कोण कोण जागा आहे.केवळ कोजागिरीलाच नाही तर सदैव माणसाने जागे राहणे आपल्या हितासाठी ते आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात... माणसाने सदैव प्रयत्नशील राहावे व उत्तम आयुष्य जगावे यासाठीच कदाचित अशा उत्सवांची योजना केलेली असावी. यामुळे मनुष्याला जीवन जगण्याची संजीवनी मिळत असते.- भाऊराव महाराज पाटील, मुक्ताईनगर

टॅग्स :Jalgaonजळगाव