शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
5
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
6
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
7
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
8
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
11
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
12
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
13
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
14
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
15
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
19
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
20
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
Daily Top 2Weekly Top 5

कामतवाडी गाव कागदोपत्री अमळनेरात

By admin | Updated: May 30, 2017 13:35 IST

अमळनेर : राज्यपालांनी अहवाल मागितला

 ऑनलाईन लोकमत/ संजय पाटील

अमळनेर, दि.30 - भौगोलिकदृटय़ा   धरणगाव तालुक्याच्या हद्दीत असलेले मात्र शासनाच्या दप्तरी अमळनेर तालुक्यात असलेल्या कामतवाडी गावाला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी 17  वर्षांपासून अडचणी सहन कराव्या लागत आहे. हे गाव धरणगाव मध्ये समविष्ट करण्यासाठी गावाने राज्यपालांकडे केलेल्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिका:यांकडे अहवाल मागवण्यात आला आहे
26 जून 1999 ला धरणगाव तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा अमळनेर तालुक्याची काही गावे धरणगाव तालुक्याला जोडण्यात आली होती. त्यात कामतवाडी या गावाचाही समावेश होता. सुमारे एक  वर्ष धरणगाव तालुक्यात राहिल्यानंतर गावाच्या मागणीनुसार राजकीय दबावात हे गाव पुन्हा 16 ऑक्टोबर 2000 मध्ये अमळनेर तालुक्यात आले.  मात्र त्यावेळी नांदेड, नारणे ही गावे धरणगाव तालुक्यातच राहिली. परिणामी कामतवाडीचे चहू बाजूचे शिवार धरणगाव तालुक्यात आहे. म्हणजे गावचे क्षेत्र धरणगावात मात्र गाव अमळनेर तालुक्यात अशी स्थिती झाली. कदाचित हे महाराष्ट्रातील एकमेव गाव असावे.  अमळनेर पासून 35 किलामीटरवर हे गाव आहे.तर धरणगावपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. दळणवळण, शैक्षणिक ,बाजारपेठसाठी त्यांना धरणगाव सोयीस्कर आहे. बँक देखील धरणगावची जवळ ,शेती धरणगाव हद्दीत आणि पशु वैद्यकीय दवाखाना ही नांदेड चा फक्त चार  किलोमीटर आहे. गावाची  गैरसोय दूर करण्यासाठी सरपंच अल्काबाई भगवान पाटील यांनी 15 ऑगस्ट 2016 रोजी ग्रामसभेत कामतवाडी   गावाचा समावेश पुन्हा धरणगाव तालुक्यात  करण्यासाठी ठराव करून राज्यपालांकडे व मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली होती. राज्यपालचे कक्ष अधिकारी नि.ग.सोनखासकर यांनी दखल घेऊन जिल्हाधिका:यांना अहवाल पाठविण्याची सूचना केली आहे. जिल्हाधिका:यांनी तालुका पातळीवर माहिती मागवली आहे
विशेष म्हणजे तालुक्याचा योग्य असा नकाशा पंचायत समिती अथवा तहसीलदार यांच्याकडे उपलब्ध नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नकाशात गाव नेमके धरण गावच्या हद्दीत असल्याचं स्पष्ट दिसते. इतर नकाशांमध्ये  तालुका सलग दाखविला आहे