Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:20 IST2025-06-25T15:18:10+5:302025-06-25T15:20:14+5:30
Jalgaon Teacher Suicide In School: शाळेच्या मधल्या सुटीनंतर मुले वर्गात परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका शिक्षकाने शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना पाचोरा येथील सुपडू भादू पाटील शाळेत बुधवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली. शाळेच्या मधल्या सुटीनंतर मुले वर्गात परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
रवींद्र भरत महाले (वय, ४२) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.महाले हे आपली पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगीसह पाचोरा येथील दहीगाव संत येथे वास्तव्यास होते. मात्र, आज शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान विद्यार्थी प्रांगणात खेळत असताना रवींद्र महाले यांनी वर्गात गळफास लावून आत्महत्या केली. मधली सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना महाले गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्यांनी इतर शिक्षकांना याबाबत माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. महाले यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणताही माहिती समजू शकलेली नाही. परंतु, मानसिक तणावातून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.