जळगाव : अलायन्स एयर या विमान कंपनीतर्फे २ मेपासून सुरु होणारी जळगाव–दिल्ली (इंदूरमार्गे) ही विमानसेवा तांत्रिक अडचणींमुळे पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही सेवा सुरु होण्यापूर्वीच स्थगित झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ही सेवा सुरु होणार असल्यामुळे जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये मोठा उत्साह होता. दिल्लीसारख्या महत्त्वाच्या शहराशी थेट हवाई संपर्क उपलब्ध होणार असल्यामुळे व्यापारी, शासकीय कामांसाठी प्रवास करणारे तसेच विद्यार्थी वर्गाला मोठी सुविधा मिळणार होती. मात्र, अचानक सेवा स्थगित झाली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानाच्या तांत्रिक तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सेवा तात्पुरती थांबवण्यात आली असून, आवश्यक दुरुस्ती आणि तपासणीनंतरच सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
Web Summary : The Jalgaon-Delhi flight service, set to begin May 2nd, has been temporarily suspended due to technical difficulties. This has disappointed travelers in Jalgaon and North Maharashtra, who were anticipating convenient direct air connectivity to Delhi. Safety is the priority, and service will resume after repairs.
Web Summary : 2 मई से शुरू होने वाली जलगांव-दिल्ली विमान सेवा तकनीकी समस्याओं के कारण अस्थायी रूप से स्थगित कर दी गई है। इस खबर से जलगांव और उत्तरी महाराष्ट्र के यात्री निराश हैं, जो दिल्ली के लिए सीधी हवाई कनेक्टिविटी का इंतजार कर रहे थे। सुरक्षा प्राथमिकता है, मरम्मत के बाद सेवा फिर से शुरू होगी।