Jalgaon Crime: काठ्या, तलवारीने हल्ला; जळगावात भाजपा-शिंदेसेनेत राडा, माजी महापौरांच्या पतीलाच मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 19:30 IST2026-03-14T19:29:10+5:302026-03-14T19:30:05+5:30
जळगावमध्ये भाजपा आणि शिंदेसेना गटात शनिवारी जोरदार राडा झाला. यात भाजपा महापौरांच्या पतीला मारहाण करण्यात आली.

Jalgaon Crime: काठ्या, तलवारीने हल्ला; जळगावात भाजपा-शिंदेसेनेत राडा, माजी महापौरांच्या पतीलाच मारहाण
जळगावमध्ये ठेकेदारीच्या वादातून दोन राजकीय गटात मारामारी झाल्याची घटना घडली. शहरातील रिधूर वाडा परिसरात भाजपा आणि शिंदेसेनेचे पदाधिकारी समोरासमोर आले. लाठ्या-काठ्या आणि तलवारीने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलीस ठाण्यातही दोन्ही गट भिडले.
माहितीनुसार, जळगाव शहरातील ठेकेदारीच्या वादातून ही घटना घडली. भाजपा आणि शिंदेसेनेचे पदाधिकारी रिधूर वाडा परिसरात आमनेसामने आले. जोरदार राडा झाला. शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील विकास कामांचे टेंडर भरण्यावरून हा वाद उफाळून आला.
शनिपेठ पोलीस ठाण्यातही दोन्ही गट भिडले
दुपारी रिधूर वाडा परिसरात राडा झाल्यानंतर दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात आले. तिथे पन्हा वादाची ठिणगी पडली आणि दोन्ही पक्षातील पदाधिकारी एकमेकांवर तुटून पडले.
जळगावच्या भाजपाच्या माजी महापौर भारती सोनवणे यांचे पती माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांना मारहाण करण्यात आली. शिंदेसेनेच्या राहुल ठाकरे यांनाही मारहाण करण्यात आली. दोन ठिकाणी झालेल्या या राड्यात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे शनिपेठ पोलीस ठाण्यात आले. त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना कारवाईबद्दल सूचना दिल्या.