शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-असोदा-भादली रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:50 IST

जळगाव : जळगाव -असोदा-भादलीसह शेळगाव-बोरावल-टाकरखेडा मार्गे यावल हा हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत मंज़ूर रस्त्याचे काम ठेकेदाराने जाणीवपूर्वक रखडवले असून सार्वजनिक ...

जळगाव : जळगाव-असोदा-भादलीसह शेळगाव-बोरावल-टाकरखेडा मार्गे यावल हा हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत मंज़ूर रस्त्याचे काम ठेकेदाराने जाणीवपूर्वक रखडवले असून सार्वजनिक बांधकाम विभागही या ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत असोदा व भादली ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या उत्साहात भूमीपूजन झालेल्या या रस्त्याचे काम ठेकेदाराने जाणीवपूर्वक रखडविले आहे.ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूस केलेल्या खोदकामामुळे देखील काही ठिकाणी भराव, काही ठिकाणी पाणी साचलेले तर काही ठिकाणी मोकळे अशी विचित्र परिस्थिती या रस्त्यांची पहावयास मिळत आहे. अशा धोकेदायक परिस्थितीत नागरिकांना वाऱ्यावर सोडून ठेकेदाराने काम बंद केलेले आहे. त्यामुळे असोदा-भादलीसह संबंधीत गावातील ग्रामस्थ रस्त्याचे काम सुरू होण्याची वाट बघत आहेत. यासंपूर्ण परिस्थितीला जबाबदार असलेल्या ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सोयीस्करपणे पाठीशी घालत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. रस्त्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर असोद्याचे किशोर चौधरी, संजय ढाके, राजू महाजन, शरद नारखेडे, संदिप नारखेडे, भादलीचे मिलिंद चौधरी, अरूण सपकाळे, शांताराम नारखेडे, राजू चौधरी, सुधीर पाटील आदींच्या सह्या आहेत.उपठेकेदारांकडून कामठेकेदाराकडून परस्पर उपठेकेदार नियुक्त करून त्यांना पुलांचे काम सोपविले आहे. उपठेकेदार यांनी ठिकठिकाणी पुलाचे काम केले असून सदयस्थितीत एका ठिकाणी काम सुरू आहे. परंतू या पुलांवरील रस्त्यांची स्थिती अत्यंत धोकेदायक असून त्या व्यतिरिक्त पूर्ण रस्ता उखडलेला आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJalgaonजळगाव