जळगावात गावठी पिस्तुलसह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:12 PM2019-10-10T12:12:16+5:302019-10-10T12:12:50+5:30

जळगाव : शिवाजी नगरातील गेंदालाल मील भागात संजय मयाराम नन्नवरे याला गावठी पिस्तुलसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ...

Jalgaon arrested one with a gun pistol | जळगावात गावठी पिस्तुलसह एकास अटक

जळगावात गावठी पिस्तुलसह एकास अटक

googlenewsNext

जळगाव : शिवाजी नगरातील गेंदालाल मील भागात संजय मयाराम नन्नवरे याला गावठी पिस्तुलसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता पकडले. त्याच्याविरुध्द शहर पोलिसात आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय नन्नवरे याच्याकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाली होती. खात्री करण्यासाठी रोहोम यांनी विजयसिंग पाटील, सुनील दामोदरे, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, विजय पाटील व सचिन महाजन यांना घटनास्थळी रवाना केले असता संजय याच्याकडे पिस्तुल आढळून आले. दरम्यान, संजय याला जळगाव व भुसावळ शहरात शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला होता, मात्र हा परवाना नंतर रद्द करण्यात आला होता. आता तर त्याच्याकडे गावठी पिस्तुल आढळून आले.

Web Title: Jalgaon arrested one with a gun pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव