शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गूळ प्रकल्पात यंदा शून्य टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:17 IST

संजय सोनवणे चोपडा : सातपुडा पर्वतात शेकडो किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन येणार्‍या गूळ नदीवरील गूळ प्रकल्पात यंदा जुलैअखेर ...

संजय सोनवणे

चोपडा : सातपुडा पर्वतात शेकडो किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन येणार्‍या गूळ नदीवरील गूळ प्रकल्पात यंदा जुलैअखेर शून्य टक्के जलसाठा आहे. यापुढे जर पावसाचे पाणी आले नाही तर मात्र शून्य साठा हा गंभीर चिंतेचा विषय ठरणार आहे. या प्रकल्पात सध्या डबके साचल्यागत पाणीसाठा दिसत आहे.

चोपडा तालुक्यातील मालापूर येथे गूळ नदीवर गूळ मध्यम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता २३.२५ दशलक्ष घनमीटर आहे. आतापर्यंत केवळ मृत म्हणजे पाणीच नसल्यागत स्थिती धरणात आहे. यावर्षी पावसाळा अर्धा संपण्याच्या स्थितीला आहे. यापैकी गेल्या दोन वर्षांपासून चोपडा शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून नगरपालिकेसाठी ३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा राखीव करण्यात आला आहे.

गेल्यावर्षी चोपडा तालुक्यात जुलै महिनाअखेर ६६८.६२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र जुलैअखेर केवळ १७४.०३ मिलिमीटर पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत यंदा चोपडा तालुक्यात कमी प्रमाणात पावसाची नोंद गेल्या वर्षाच्या तुलनेत झाल्याचे निष्पन्न होते. पुढील काही दिवसांत जर पावसाने पुन्हा दडी मारली तर शासनासह तालुकावासीयांसाठी व परिसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे.

गूळ मध्यम सिंचन प्रकल्प तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी मालापूर येथे गूळ नदीवर बांधण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये धरणाची जास्तीत जास्त उंची ३१.३३ मीटर आणि १७५ मी. लांबीचा दगडी बांध आणि २८.७६ मी. जास्तीत जास्त उंचीचा कॉंक्रीट धरणाचा समावेश आहे. ४२ मीटर लांबीच्या गेटमधून १८३०.३० क्यूसेक पाणी विसर्ग करण्याची क्षमता आहे. चोपडा तालुक्यातील ११ गावांमधील ३७०८ हेक्टर क्षेत्र सिंचन करण्याची क्षमता आहे. या प्रकल्पात ३.६७ किमी लांबीचा डावा कालवा (एलबीसी) आणि ४.६२ किमी लांबीचा उजवा कालवा (आरबीसी) यांचा समावेश आहे. धरणात पाणीसाठाच झाला नाही तर वरीलपैकी एकही लाभ मिळणार तर नाहीच, उलट चोपडा शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. तालुक्यात दमदार पाऊस पडण्याची गरज आहे.

फोटो