शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

गूळ मध्यम प्रकल्पात यंदा शून्य टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST

चोपडा : सातपुडा पर्वतात शेकडो किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन येणार्‍या गूळ नदीवर तालुक्यातील मालापूर येथे गूळ मध्यम प्रकल्पाची निर्मिती ...

चोपडा : सातपुडा पर्वतात शेकडो किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन येणार्‍या गूळ नदीवर तालुक्यातील मालापूर येथे गूळ मध्यम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पात यंदा जुलैअखेर शून्य टक्के जलसाठा आहे. यापुढे पावसाचे पाणी आले नाही तर मात्र शून्य साठा हा गंभीर चिंतेचा विषय ठरणार आहे. या प्रकल्पात सध्या डबके साचल्यागत पाणीसाठा दिसत आहे.

चोपडा तालुक्यातील मालापूर येथे गूळ मध्यम प्रकल्पाची गूळ नदीवर निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता २३.२५ दशलक्ष घनमीटर आहे. आतापर्यंत केवळ मृत म्हणजे पाणीच नसल्यागत स्थिती धरणात आहे. म्हणजेच शून्य टक्के पाण्याचा साठा यावर्षी पावसाळा अर्धा संपण्याच्या स्थितीला आहे. यापैकी गेल्या दोन वर्षापासून चोपडा शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून नगरपालिकेसाठी ०३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा राखीव करण्यात आला आहे. गेल्यावर्षी चोपडा तालुक्यात जुलै महिनाअखेर ६६८.६२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र जुलैअखेर केवळ १७४.०३ मिलीमीटर पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत यंदा चोपडा तालुक्यात कमी प्रमाणात पावसाची नोंद गेल्या वर्षाच्या तुलनेत झाल्याचे दिसते. पुढील काही दिवसांत जर पावसाने पुन्हा दडी मारली तर मात्र तालुक्यातील महत्त्वाकांक्षी असलेला गूळ प्रकल्पातील नसलेला पाणीसाठा प्रशासनासह तालुकावासीयांसाठी व परिसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे.

गूळ प्रकल्प : एक दृष्टिक्षेप

गूळ प्रकल्पात धरणाची जास्तीत जास्त उंची ३१.३३ मीटर आणि १७५ मीटर लांबीचा दगडी बांध आणि २८.७६ मीटर जास्तीत जास्त उंचीचा कॉंक्रीट धरणाचा समावेश आहे. ४२ मीटर लांबीच्या गेटमधून १८३०.३० क्यूसेकचे निर्वहन करण्याची क्षमता आहे.

चोपडा तालुक्यातील ११ गावांमधील ३७०८ हेक्टर क्षेत्रातील सिंचन करण्याची क्षमता आहे. या प्रकल्पात ३.६७ किमी लांबीचा डावा कालवा (एलबीसी) आणि ४.६२ किमी लांबीचा उजवा कालवा (आरबीसी) यांचा समावेश आहे. या प्रकल्पाची अंतिम सिंचन क्षमता ३०२५ हेक्टर आहे.

या प्रकल्पावर आधारित इतर फायदे मत्स्य व्यवसाय हा आहे. धरणात पाणीसाठाच झाला नाही तर वरीलपैकी एकही लाभ मिळणार तर नाहीच, उलट चोपडा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. म्हणून दमदार पाऊस पडावा, अशी वरुणराजाला आळवणी केली जात आहे.