शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

पॅंसेजर सुरू करण्याबाबत संसदेत आ‌वाज उठवावा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST

जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर सेवा बंद असल्यामुळे सर्व सामान्य माणसांचे चांगलेच हाल होत आहेत. प्रवासी संघटनांनी ...

जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर सेवा बंद असल्यामुळे सर्व सामान्य माणसांचे चांगलेच हाल होत आहेत. प्रवासी संघटनांनी व रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी रेल्वे प्रशासनाकडे पॅसेंजर गाड्या सुरू करण्याबाबत अनेकदा मागणी करूनही, अद्याप एकही पॅसेंजर रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली नाही. खासदार उन्मेष पाटील यांनीदेखील गेल्या आठवड्यात पॅसेंजर सुरू करण्याबाबत डीआरएम यांच्यांशी फोन वरून चर्चा केली.मात्र, एवढे सगळे रामायण होऊनही, रेल्वे प्रशासन ऐकत नसल्यामुळे खासदार उन्मेष पाटील यांनी आता १९ जुलैपासून होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पॅसेंजर सुरू करण्याबाबत आ‌वाज उठविणे गरजेचे आहे, अशी चर्चा बुधवारी चाळीसगावहून जळगावकडे येणाऱ्या काशी एक्सप्रेसमध्ये चांगलीच रंगली होती. पाचोऱ्याला काशी एक्सप्रेस थांबल्यानंतर, पाचोऱ्याहूनही दोन प्रवासी या एक्सप्रेसमध्ये बसले. त्यांनीदेखील चाळीसगावच्या प्रवाशांची पॅसेंजर सुरू होण्याबाबत चर्चा ऐकून, या चर्चेत सहभाग घेतला. पाचोऱ्याहून बसलेल्या दीपक पवार नावाच्या प्रवाशाने चाळीसगावच्या प्रवाशांशी बोलतांना सांगितले की, केंद्रात भाजपाचे सरकार असून, जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपाचे आहेत. मात्र, दीड वर्षात एकाही खासदाराने पॅसेंजर सुरू करण्याबाबत पुढाकार घेतलेला दिसून आला नाही. तसेच गीतांजली एक्सप्रेसला पाचोरा व चाळीसगावला थांबा देण्याबाबत अनेक वर्षापासून मागणी सुरू असून, ती मागणीदेखील अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे खासदारांनी आता याच्या-त्याच्याशी बोलण्यापेक्षा खरोखर त्यांना मतदार संघातील नागरिकांची काळजी असेल, पॅसेंजर सुरू करण्याबाबत थेट संसदेत आ‌वाज उठवावा, अशी मागणी करून, चाळीसगावच्या प्रवाशांना खासदारांकडे पॅसेंजर सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याचा सल्लाही दिला.