विमा योजना जाहीर

By Admin | Updated: June 16, 2014 12:44 IST2014-06-16T12:44:10+5:302014-06-16T12:44:10+5:30

जिल्ह्याचा राज्य शासनाने खरीप हंगामासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये सहभाग केला आहे. कापूस व इतर पिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

Insurance Scheme Announced | विमा योजना जाहीर

विमा योजना जाहीर

>जळगाव : जिल्ह्याचा राज्य शासनाने खरीप हंगामासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये सहभाग केला आहे. कापूस व इतर पिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. 
भारतीय कृषी विमा कंपनीतर्फे महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरून ही योजना राबविली जाईल. जिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. त्याचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख हेक्टरपुढेच असते. यामुळे कापूस, त्यानंतर ज्वारी, उडीद व मूग या पिकांसाठी ही योजना आहे. कापूस, उडीद व ज्वारीसाठी ८६ महसूल मंडळे आणि मुगासाठी ८३ महसूल मंडळांत ही योजना लागू केली आहे. 
पावसाचा खंड पडला तर संरक्षणअपूर्ण पाऊस, पावसातील खंड आणि अतिपाऊस या स्थितीमध्ये चारही पिकांना विम्याचे संरक्षण दिले जाईल. 
-----------
कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांच्यासाठी योजनेची सक्ती करण्यात आली आहे.खरिपाखाली जिल्ह्यात सात लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्र व्यापले जाते. कापसापाठोपाठ मका या पिकाची पेरणी किंवा लागवड केली जाते. परंतु मका पिकास संरक्षण नसल्याने शेतकरी नाराज आहेत. तसेच सोयाबीनचे क्षेत्रही ३0 ते ३५ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत म्हणजेच उडीद व मुगाच्या क्षेत्राएवढेच असते. पण सोयाबीनचादेखील विमा योजनेमध्ये समावेश नाही. 

Web Title: Insurance Scheme Announced