शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी शासनाने मागविली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:52 IST

पात्र शेतकऱ्यांसह थकबाकीदारांच्या माहितीचे संकलन

जळगाव : शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर नवीन सरकारकडून शेतकरी कर्जमाफीबाबत हालचाली सुरू झाल्या असून सहकार विभागाकडून यासाठी माहिती मागविण्यात येत आहे. यामध्ये कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात, थकबाकीदार शेतकºयांची संख्या व इतर माहितीचा समावेश असून त्यासाठी सहकार विभागाकडून ही माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू झाले.शेतकरी कर्जमाफीसाठी या पूर्वीच्या सरकारच्या काळात अगोदर राजकीय पक्षांचे आंदोलन व नंतर स्वत: शेतकºयांनीच सुरू केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन राज्य शासनाने दीड लाखांपर्यंतच्या थकबाकीला कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातही आधी २०१२ ते २०१६ पर्यंतचे थकबाकीदार शेतकºयांचा समावेश होता. नंतर त्यात सुधारणा करून २००९ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश करण्यात आला. यासाठी जिल्ह्यातून वेगवेगळ््या याद्या मागविण्यात आल्या. सोबतच यामध्ये अनेक जाचक अटी असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत आले. अद्यापही जिल्ह्यातील ४० ते ४५ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत.त्यात आता राज्यातील महाराष्टÑ विकास आघाडीच्या सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसाठी हालचाली सुरू झाल्या. त्यानुसार यासाठी जिल्हा स्तरावरून माहिती मागविण्यात येत आहे.यात या योजनेसाठी किती शेतकरी पात्र ठरू शकतात, त्यांची संभाव्य संख्या, थकबाकीदार शेतकºयांची संख्या, कोणाकडे किती वर्षापासून थकबाकी आहे, इत्यादी माहिती मागविली जात आहे. यासाठी सहकार विभागाकडून ही माहिती एकत्रित करणे सुरू आहे.घोषणा तर झाली आहे, मात्र अगोदरच्याच योजनेतील हजारो शेतकरी लाभापासून वंचित असल्याने प्रत्यक्षात नवीन कर्जमाफी योजनेबाबत काय निर्णय होतो, त्यात काय अटीशर्थी लावल्या जातात व प्रत्यक्षात कधी लाभ मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव