जवाहर हायस्कूल येथे पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:18 IST2021-09-27T04:18:05+5:302021-09-27T04:18:05+5:30

भातखंडे बुद्रुक, ता. भडगाव : गिरड येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांचा पुण्यस्मरण ...

Inauguration of Remembrance Week at Jawahar High School | जवाहर हायस्कूल येथे पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन

जवाहर हायस्कूल येथे पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन

भातखंडे बुद्रुक, ता. भडगाव : गिरड येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांचा पुण्यस्मरण सप्ताह उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव हरी पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सदस्य पी. सी. धनगर, भास्कर पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील उपस्थित होते. प्रस्तावना प्राचार्य एस.व्ही. शिंदे यांनी केली. शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी कर्मवीर तात्यासाहेबांच्या शैक्षणिक योगदानाबद्दलचे महत्त्व विशद केले. माजी प्राचार्य पी. सी. धनगर, शिक्षक नितीन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

उद्घाटनात रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. या वेळी शंभर मीटर धावणे, गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा, ऑनलाइन व्याख्यान आदींचेदेखील आयोजन सप्ताहात करण्यात आले आहे. सूत्रसंचालन सचिन बोरसे व आभार रमेश धनगर यांनी मानले.

यशस्वितेसाठी प्राचार्य एस.व्ही. शिंदे, उपमुख्याध्यापक बी.पी. पवार, पर्यवेक्षक एस.एन. पाटील, ज्युनियर कॉलेजचे कार्यवाह डी. डी. भोसले यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Inauguration of Remembrance Week at Jawahar High School