रोकड बालाजी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 09:19 PM2019-10-14T21:19:47+5:302019-10-14T21:19:52+5:30

चोपडा : शहरातील गांधी चौकात उभारलेल्या ऐतिहासिक श्री रोकड बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त तिरुपती बालाजींच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रमास १५ ...

 Idol installation today at Rokad Balaji Temple | रोकड बालाजी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना

रोकड बालाजी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना

Next


चोपडा : शहरातील गांधी चौकात उभारलेल्या ऐतिहासिक श्री रोकड बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त तिरुपती बालाजींच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रमास १५ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांसाठी समित्यांचे गठण केले आहे. शोभायात्रा समितीत संजय सोमाणी, पवन अग्रवाल, यशवंत चौधरी, अनिल अग्रवाल, संजय शर्मा, मनोज अग्रवाल, सागर बडगुजर, दीपक पाटील, शैलेश अग्रवाल, राजेंद्र स्वामी, सुरेश अग्रवाल यांचा समावेश आहे. याबरोबरच मंदिर पूजा समिती, स्वागत समिती, मंडप व मंदिर सजावट समिती, भजनी मंडळ, पूणार्हूती व प्रसाद वितरण समिती सदस्यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमांचाच लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title:  Idol installation today at Rokad Balaji Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.