शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्सॲप’वरून पटली मृतदेहाची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:12 IST

फोटो : २.४१ वाजेचा मेल आहे, सागर दुबे नावाने लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मेहरूण तलावात एका अज्ञात ...

फोटो : २.४१ वाजेचा मेल आहे, सागर दुबे नावाने

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मेहरूण तलावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली होती. अखेर त्या अज्ञात तरुणाची ओळख पटली असून, कैलास प्रकाश सोनवणे (३०, रा. फुले मार्केट, जळगाव) असे मयताचे नाव आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या मृतदेहाची ओळख पटली आहे.

मेहरूण तलावात बुधवारी सायंकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला होता. नंतर या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटावी म्हणून विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर त्याचा फोटो शेअर केला. गुरुवारी रात्री मृत व्यक्तीचे नातेवाईक अक्षय शिंदे व गोलू पवार यांना व्हॉट्सॲपवर फोटा दिसल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. नंतर मृताची ओळख पटविली. मृत तरुणाचे नाव कैलास प्रकाश सोनवणे असे असल्याचे समोर आले.

रसवंतीवर करायचा काम

कैलास हा जळगाव शहरात कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. नंतर कल्याण येथे तो सात ते आठ वर्षे राहिला. मात्र, गेल्या दीड वर्षापासून फुले मार्केटमधील एका रसवंतीवर काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा. तर रसवंतीच्या एका खोलीतच तो राहत असे. त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुले असून ते कल्याण येथे राहत असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

मृताची ओळख पटल्यानंतर शुक्रवारी सकाळी नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्‍यात आला. दरम्यान, ही आत्महत्या असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्‍यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय अमोल मोरे व हेमंत पाटील करीत आहेत.