शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

झोपेतच चाकूने पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात हजर होत दिली खूनाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:11 IST

जळगावात झोपेतच पत्नीची चाकूने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी खूनाची  घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयासह माहेरून दहा लाख रुपये आणावे यासाठी पतीने पत्नीची झोपेतच हत्या केली. नितीन दौलत शिंदे (वय ३५) याने पत्नी अर्चना ऊर्फ कविता नितीन शिंदे (वय ३२) हिचा खून केला. त्यानंतर तो स्वतः पोलीस पोहोचला आणि गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयताचा भाऊ आकाश सपकाळ याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

नितीन आणि अर्चना यांच्यात वाद सुरू होता. त्यात नितीन हा अर्चना हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच माहेरून दहा लाख रुपये आणावे, यासाठी तगादा लावला होता. त्या वादातूनच मध्यरात्री अर्चना झोपेत असताना नितीनने तिच्यावर हल्ला चढवत शस्त्राने वार केले. अर्चना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती त्याने तिच्या आईला दिली. त्यानंतर अर्चनाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत असतानाच रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आपण खून केल्याचे सांगत नितीन हा लोहारा पोलिसांच्या स्वाधीन झाला. याप्रकरणी मयत अर्चना हिची सासू बेबाबाई हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी अटकेत असलेल्या नितीन आणि बेबाबाई शिंदे यांना पाचोरा न्यायालयात हजर केले. दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मयत अर्चना ही शिवना येथील आपल्या नातेवाइकांना भेटून सायंकाळीच लोहारा येथे आल्याचे बोलले जात आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. या घटनेनंतर या चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले आहे.

अर्चना मंगळवारी रात्री हरिपाठ करण्यासाठी बसस्थानक परिसरात गेली होती. दिवसभर शेतात काम करुन रात्री हरिपाठ केल्यानंतर अर्चना घरात झोपली होती. त्यानंतर नितीन उशिराने घरी आला आणि त्याने भाजीपाला कापण्यासाठीच्या चाकूने झोपेत असलेल्या अर्चनावर सपासप वार केले.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस