शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी भुयारी मार्गाचे अडले घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:09 IST

जळगाव : रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्ता म्हणून ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा तयार करण्याची मनपाला परवानगी दिली असून, त्यासाठी खर्चाचे ...

जळगाव : रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्ता म्हणून ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा तयार करण्याची मनपाला परवानगी दिली असून, त्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रकही पाठविले आहे. मात्र, मनपाकडे निधी नसल्यामुळे हे काम थांबले आहे तर दुसरीकडे शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु असल्यामुळे, मनपाने तात्काळ भुयारी बोगद्याासाठी निधी उपलब्ध द्यावा, अशी मागणी शिवाजी नगरवासियांनी मंगळवारी सायंकाळी मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, शिवाजीनगरवासियांनी उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत तहसिल कार्यालयाजवळ तात्पुरते गेट किंवा ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा उभारण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. यासाठी हजारो शिवाजीनगरवासियांनी रेले रोको आंदोलनदेखील केले होते. तरीदेखील रेल्वे प्रशासनाने तहसिल कार्यालयाजवळ गेट उभारले नाही. मात्र, दोन महिन्यांपूर्वी ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच यासाठी मनपाला ५ कोटी ७७ लाखांचे अंदाजपत्रकही पाठविले आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्ता म्हणून शिवाजीनगर वासियांची भुयारी बोगदा उभारण्याची मागणी मंजुर केली आहे. मात्र, या कामासाठी मनपाकडे निधी नसल्यामुळे, या कामाचे भूमीपूजनही झालेले नाही. यामुळे नागरिकांना उड्डाणपुल तयार होण्याची वाट पाहावी लागणार आहे.लोकमतच्या वृत्तानंतर आयुक्तांकडे केली मागणीशिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटला असून, अद्याप पायाभरणीचेंही काम झालेले नाही. रेल्वेने १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उदिष्ठ ठेवले असतांना, आता ११ महिन्यांत उड्डाणपुलाचे काम पुर्ण होणार का.. अशा जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे. पुलाच्या संथ गतीच्या कामाबाबत ‘लोकमत’ ने मंगळवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीच्या वतीने तेथील रहिवासी दिपक गुप्ता यांनी आयुक्तांनी भेट घेतली. पुलाच्या कामाला विलंब होणार असल्याने, ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगद्यासाठी निधी देऊन, पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव