शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मदतीने मजुर महिलेला ४६ हजार मिळाले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 21:27 IST

व्यसनाधीन पतीनेच लांबविली रक्कम : वॉरंटमध्ये पोलिसांनी केली अटक

जळगाव : दहा वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला पोलिसांनी अटक केली, मात्र तत्पूर्वीच त्याने घरातून पत्नीचे ४८ हजार रुपये व्यसनासाठी लांबविल्याचा प्रकार उघड झाला. उधळपट्टी होण्याच्याआधीच पोलिसांनी त्यातील ४६ हजार रुपये वसूल करुन ती रक्कम पत्नीला परत दिली. हा प्रसंग पाहून या महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी ही सुखद घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबापुरातील दिलीप बाबुराव शेरमाळे हा २००९ मध्ये दाखल असलेल्या अपघाताच्या गुन्ह्यात फरार होता. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोध मोहीमेत शेरमाळे याला रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या आदेशाने राजेंद्र सैंदाणे, प्रवीण मांडुळे, महेंद्रसिंग पाटील व नितीन पाटील यांनी इच्छा देवी चौक परिसरातून ताब्यात घेतले.अटकेची प्रकिया करण्यापूर्वी पोलिसांनी शेरमाळे याची पत्नी पद्माबाई यांना ही माहिती दिली असता, शेरमाळे याला दारुचे व्यसन असून त्याने घर संसाराचे ४८ हजार रुपये लांबविल्याची माहिती पोलिसांना दिली. निरीक्षक शिरसाठ यांनी त्याची चौकशी असता त्याने त्यातील काही रक्कम दारुसाठी खर्च केली होती तर ४६ हजार ६८० रुपये जवळ असल्याची कबुली दिली. शिरसाठ यांनी दम भरल्यानंतर त्याने ही रक्कम काढून दिली.सोमवारी दुपारी त्याची पत्नी पद्माबाई यांना ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. शेरमाळे कुटुंब मजुरी करतात. मुलांचे शिक्षण व घर संसारासाठी त्यांनी पै पै गोळा केले होते. ही रक्कम पोलिसांनी वसुल केली नसती तर दारुमध्ये त्याची उधळपट्टी झाली असती व कुटुंब उघड्यावर आले असते असे पद्माबाई यांनी पोलिसांना सांगितले..यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव