शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव परिसरात मुसळधार पाऊस; चाळीसगावला ३० दिवसांत पाचव्यांदा पूर, अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 10:28 IST

सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पाचोरा शहराच्या अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर भडगाव तालुक्यातील घुसर्डी गावात पुराचे पाणी घुसले आहे. धुवांधार पावसामुळे भोरटेक येथील बबन धनगर यांचे घर कोसळले असून सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही.

जळगाव - जळगाव जिल्ह्य तथा परिसरात सोमवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या ३० दिवसांत चाळीसगावमधील डोंगरी आणि तितूरला पाचव्यांदा पूर आला आहे. पुराचे पाणी बाजारात शिरले आहे. याशिवाय अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. (Heavy rain in Chalisgaon area; Fifth flood in 30 days)

या पुरामुळे नव्या आणि जुन्या गावचा संर्पक तुटला आहे. तर दुसरीकडे देवळी गावाजवळ चाळीसगाव-मालेगाव रस्त्याचे काम सुरु असल्याने कडेला असलेला भराव मंगळवारी झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे.

जामनेर तालुक्यात सोमवारी  रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर नदीलाही मोठा पूर आला आहे. वाकोद, पहूर व नेरी गावातून वाहणारी वाघूर नदीही खळाळली आहे. उगम क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जामनेरमधून वाहणाऱ्या कांग नदीलाही पूर आला आहे. 

घुसर्डी गावात घुसलं पुराचं पाणी -सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पाचोरा शहराच्या अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर भडगाव तालुक्यातील घुसर्डी गावात पुराचे पाणी घुसले आहे. धुवांधार पावसामुळे भोरटेक येथील बबन धनगर यांचे घर कोसळले असून सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही.मराठवाड्यातही जोरदार पाऊसमराठावाड्यातही सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला आणि नांदेड जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत.

कजगावला पुराच्या पाण्याचा वेढा. नगरदेवळा येथे बाजारपेठ पाण्यात -भडगाव तालुक्यातील कजगावला सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. नगरदेवळा ता. पाचोरा येथील अग्नावती नदीला महापूर आला आहे.  संपूर्ण बाजारपेठ पाण्यात गेली आहे. यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. येथील महादेव मंदिरातही ३ ते ४ फूट पाणी शिरले आहे. तोंडापूर ता. जामनेर येथे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे. 

टॅग्स :floodपूरJalgaonजळगावRainपाऊस