शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

हातच्या हंगामाला गारांनी पिटाळले!

By admin | Updated: February 12, 2015 13:30 IST

सातपुड्यात गारा व पावसामुळे आंबेमोहर गळून पडला असून जळगाव जिल्ह्यात सात ते आठ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

विशाल गांगुर्डे

पिंपळनेर जळगाव/नंदुरबार/धुळे : खान्देशात मंगळवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रचंड नुकसान झाले आहे. सातपुड्यात गारा व पावसामुळे आंबेमोहर गळून पडला असून जळगाव जिल्ह्यात सात ते आठ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्रात पिकांना फटका बसला आहे. खान्देशात मंगळवारी रात्री अनेक भागात गारपिटीचा तडाखा बसला. साक्री तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. जळगाव जिल्हा : बेमोसमी पावसाने गहू, हरभरा, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले व आंब्यांचा मोहर गळून पडला आहे. महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गिरणा परिसरात गहू, मका, लिंबू, शेवगा, हरभरा आदी पिकांचेही मोठे नुकसान झाले. फळबागांनाही याचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्हा : नवापूर तालुक्यातील काही भागात गारपीट झाली. गारांमुळे भातासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आंबे मोहराचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्हा : साक्री व पिंपळनेरच्या काही क्षेत्रात दुसर्‍या दिवशी बुधवारीसुद्धा शेतात गारांचा थर साचलेला होता. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

------

हंगामाला 'मार'पीट' शेतकर्‍यांचे चोपडा तालुक्यात १८२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. शेतकर्‍यांच्या (९३ गावांतील) पिकांना तडाखा बसला आहे. हेक्टर क्षेत्र फक्त रावेर तालुक्यातच बाधित झाले. मिनिटांच्या गारपिटीने रावेर, यावल, चोपडा तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील रोहाणे येथे दुसर्‍या दिवशी बुधवारीसुद्धा शेतात गारांचा थर साचलेला होता.