अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:38+5:302021-08-25T04:20:38+5:30

या अभिवादन सभेत शहरातील नागरिक उपस्थित होते. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून अभिवादन सभेचे उद्घाटन करण्यात आले. ...

Greetings to Narendra Dabholkar on behalf of Andhashraddha Nirmulan Samiti | अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन

Next

या अभिवादन सभेत शहरातील नागरिक उपस्थित होते. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून अभिवादन सभेचे उद्घाटन करण्यात आले. नीता सामंत यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना व इतिहास यावर मार्गदर्शन केले. सागर नागणे यांनी जादूटोणा विरोधी कायदा आणि त्याचा लढा व प्रवास समजावून सांगितला तर दिलीप चव्हाण यांनी अंनिस प्रेरणा उद्देश आणि माझा सहभाग, यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन कलप्तेश देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक नितीन परदेशी यांनी केले. या अभिवादन सभेत अभिवादन गीत सादर करण्यात आले. त्यात मोनाली कांबळे, जयश्री गायकवाड, शीतल पाटील, संघमित्रा त्रिभुवन, कविता सावले, रत्ना शेजवळ, सपना अहिरे, उज्ज्वला कांबळे हे सहभागी होते. सुनील गायकवाड व आशुतोष अहिरे यांनी साथसंगत केली. या सभेस प्रा. विजया चव्हाण, वैशाली निकम, प्रतिभा पाटील, मंदा कांबळे, प्रा. गौतम निकम, गणेश भोई, सतीश पाटील, नीलेश परदेशी, शंकर पगारे, प्रा. किरण पाटील, सचिन आगोने उपस्थित होते.

Web Title: Greetings to Narendra Dabholkar on behalf of Andhashraddha Nirmulan Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.