वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना शासनाचा ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST2020-12-05T04:25:52+5:302020-12-05T04:25:52+5:30

जळगाव : लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या जिल्ह्यातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना धान्याचे वाटप केले जात आहे. ...

Government's 'support' for prostitutes | वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना शासनाचा ‘आधार’

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना शासनाचा ‘आधार’

जळगाव : लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या जिल्ह्यातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना धान्याचे वाटप केले जात आहे. अमळनेर, भुसावळ, चोपडा येथील १७१ महिलांना आतापर्यंत ४२ क्विंटल धान्याचे वाटप झाले आहे. या सोबतच या महिलांना अर्थ सहाय्यदेखील दिले जाणार असून यासाठी जिल्ह्यातील अशा महिलांसाठी ३५ लाखाचा निधी उपलब्ध झाला असून त्याचे वाटपही लवकरच सुरू होणार आहे.

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अशा महिलांसाठीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १७१ महिलांना लाभ मिळत असून आतापर्यंत ४२ क्विंटल धान्याचे वाटप जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. या सोबतच ३५ लाखाचा निधी मंजूर झाला असून त्याचे चार ते पाच दिवसात वाटप सुरु होणार आहे. यामध्ये एका महिलेला पाच हजार रुपये व तिला अपत्य असतील तर त्याला अडीच हजार रुपये असे एकूण साडे सात हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

Web Title: Government's 'support' for prostitutes