शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सरकार लोकभावनांप्रती संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 16:26 IST

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार तथा करविषयक पुस्तकांचे लेखन करणारे अनिलकुमार शाह यांनी बांगला देशात भेट दिली होती. या भेटीवर आधारित लेखमाला त्यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीसाठी लिहिली. आज या लेखमालेचा शेवटचा बारावा भाग.

बांगला देशात मी खूप काही फिरलो नाही, पण एकूणच जी मोठमोठी पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत, सरकार लोकभावनांप्रती संवेदनशील आहे, जागरूक आहे, त्यावरून येणाऱ्या पाच वर्षांनी बांगला देश नक्की वेगळा असेल असे मला वाटते.आपल्या देशातून गंगा निघते ती या देशात नवाबगंजजवळ पद्मा होते. पुढे मेघनाला जाऊन मिळते आणि मेघना होऊनच बंगालच्या उपसागराला मिळते. ब्रह्मपुत्रेचे पात्र आसामपासून भारतातील भागात ते बांगला देशात शिरेपर्यंत आणि पुढेही खूप विशाल आहे. बांगला देशात तिही पुढे पद्मा नदीला जाऊन मिळते आणि पद्मा पुढे मेघनाला. पद्मा नदीला या देशाची जीवनदायिनी म्हणतात.बांगला देश स्वतंत्र झाल्यावर भारताने मार्च १९७२ मध्ये त्यांच्याशी १२ कलमी शांतता करार केला होता. भारताने २०१७ ला संपलेल्या ७ वर्षात त्यांना ६०,८०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. विदेश मंत्रालयाने भारत-बांगला देश संबंधावर सप्टेंबर २०१७ मध्ये एक विशेष पत्रिका जाहीर केली आहे. त्यात दोन्ही देशात झालेले विविध करार आणि अनेक पातळ्यांवर संबंध विकसित कसे होत आहेत याची सविस्तर माहिती दिली आहे.त्यातली एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. भारतातून वाहणाºया ५४ नद्या बांगला देशात जातात. त्यामुळे बांगला देशातल्या नद्यांच्या सफाईच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना भारत मोठे आर्थिक सहाय्य करीत आहे. साधारण ४०० कोटी रुपये खर्चाच्या ८० टक्के खर्च भारत देतोय. त्यामागे अर्थातच भारताचा स्वार्थही आहेच. आसामसह पूर्वोत्तरची सातही राज्ये जलमार्गाने बांगला देशच्या चित्तगोंग बंदराशी थेट जोडली जातील. तेथून थेट आयात-निर्यात जगभरात होऊ शकते. पर्यायाने ती सातही राज्ये उर्वरित जगाशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत. याचा खूप मोठा फायदा आपल्या पूर्वोत्तर राज्यांना व भारताला होईल हे निश्चित.एक विलक्षण गोष्ट सांगून ही साठा उत्तराची प्रवासकथा, लोकमत आणि खास करून जळगावचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांचे अत्यंत मन:पूर्वक आभार मानून, बारा उत्तरी थांबवतो.बांगला देशाचे राष्ट्रगीत- ‘आमार शोनार बांगला, आमी तोमाय भालोबाशी, चिरोदिन तोमार आकाश, तोमार बाताष आमार प्राणे बजाय बाशी...’ लोकसंगीतात बांधलेले हे सुंदर गीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी स्वत:च्या बंगाल राज्याची महती म्हणून लिहिले आहे. १९७१ मध्ये बांगला देशाच्या स्वातंत्र्यानंतर या मूळ गीतातल्या पहिल्या दहा ओळी या देशाने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्या. समर दास या प्रसिद्ध संगीतकाराने ते राष्ट्रगीत वाटावे म्हणून नव्याने संगीतबद्ध केले. हे राष्ट्रगीत मी तेथे रोटरीच्या सभेत ऐकले. एकाच कवीची दोन गीते दोन शेजारी राष्ट्रांची राष्ट्रगीते आहेत हा विलक्षण आणि जगात एकमेव योग. बांगला देश आणि भारत यांचा हा अनोखा संबंध एका कवीने त्यांच्या स्वत:च्याही नकळत बांधून दिला, कायमचा. कवी कोणत्याही देशाच्या कसा सीमापार असतो हे चक्षुर्वैसत्यम पाहून गुरुदेवांना मी मनोमन वंदन केले आणि बांगला देशाचा निरोप घेतला. (समाप्त)-अनिलकुमार शाह, जळगावमोबा. ९४२२२ ७६ ९०२

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव