शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध शिथिल होताच सोने-चांदीला चकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 23:34 IST

चांदी ७३ हजाराच्या पुढे : सोनेही ५० हजाराच्या दिशेने जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू होण्यासह ...

चांदी ७३ हजाराच्या पुढे : सोनेही ५० हजाराच्या दिशेने

जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू होण्यासह इतरही व्यवहारांना परवानगी मिळाल्यानंतर सोने-चांदी खरेदी वाढत असून यामुळे त्यांचे भाव देखील वधारले आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर चांदीचे भाव ७३ हजाराच्या पुढे गेले असून सोने देखील ५० हजाराच्या दिशेने जात आहे. सध्या चांदी ७३ हजार ५०० रुपये प्रति किलो तर सोने ते ४९ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे संकट ओढवले त्यावेळी सोने चांदीत अधिक गुंतवणूक वाढून या दोन्ही मौल्यवान धातूंनी नवी उच्चांकी गाठली होती. त्यानंतर भाव कमी-कमी होत गेले. आता यंदादेखील कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर ६ एप्रिल पासून सुवर्ण बाजार बंद असला तरी कमोडिटी बाजारात उलाढाल सुरू होती. यात अनेकांनी सोने-चांदीची खरेदी केली. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील गुंतवणूक वाढत असल्याने सोने-चांदीचे भाव वाढतच गेले. 

दोन महिन्यात चांदीच्या भावात सात हजारांहून अधिक वाढकोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध लागू झाल्यानंतर ६ एप्रिल रोजी सुवर्ण बाजार बंद झाला. तेव्हापासून ते आतापर्यंत चांदीच्या भावात सात हजार ४०० रुपये तर सोन्याच्या भावात तीन हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. या बंद दरम्यान गुढीपाडवा, अक्षयतृतीया हे दोन महत्त्वाचे खरेदीचे मुहूर्त हुकले. मात्र कमोडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरूच राहून या दोन्ही मुहूर्तावर खरेदीचे प्रमाण वाढलेले होते.  ६ एप्रिल रोजी सुवर्ण बाजार बंद झाला त्यावेळी सोने ४६ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर होते. त्यानंतर अक्षयतृतीयेपर्यंत ते ४७ हजार ७०० रुपये प्रति तोळयावर पोहोचले. ही वाढ कायम राहत २६ मे पर्यंत सोने ४९.२२०  रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. मात्र २७ मे रोजी सोन्यात ६०० रुपयांची घसरण झाली व ते ४८ हजार ६२० रुपयांवर आले. त्यानंतर पुन्हा वाढ होत जाऊन १ जून रोजी सुवर्ण बाजार सुरू झाला त्या दिवशी ४९हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर सोने पोहचले. पुन्हा यात वाढ होत जाऊन आता ते ४९ हजार ६०० रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचले आहे. अशाच प्रकारे ६ एप्रिल रोजी सुवर्ण बाजार बंद झाला त्यावेळी चांदी ६६ हजार १०० रुपये प्रति किलो होती. अक्षयतृतीयेपर्यंत ती ७१ हजार २०० रुपयांवर पोहोचली. ही वाढ कायम राहत १ जून रोजी निर्बंध शिथिल झाल्यानंतर ७३ हजार रुपये प्रति किलोवर चांदीचे भाव पोहोचले. आता पुन्हा हळूहळू वाढ होत जाऊन ७३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर ती पोहोचली आहे.

वाढती गुंतवणूककोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचे पुन्हा गुंतवणूक वाढत असल्याने या दोन्ही धातूंचे भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सोने-चांदी खरेदीचे प्रमाण ६७ टक्के असून २७ टक्के विक्रीचे प्रमाण आहे तर ६ टक्के व्यवहार थांबलेले (होल्डवर) आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव