सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून सोने, रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST2021-07-30T04:16:52+5:302021-07-30T04:16:52+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनूस शेख हे मेहरुणमधील गणेश नगरात पत्नी सायरा बानो खान यांच्यासह वास्तव्याला आहेत. मुलगा रिजवान ठाणे ...

Gold, cash stolen from retired teacher's house | सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून सोने, रोकड लांबविली

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून सोने, रोकड लांबविली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनूस शेख हे मेहरुणमधील गणेश नगरात पत्नी सायरा बानो खान यांच्यासह वास्तव्याला आहेत. मुलगा रिजवान ठाणे येथे वास्तव्याला असल्याने १२ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घराला कुलूप लावून दाम्पत्य ठाण्याकडे रवाना झाले. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता ते घरी आले असता, घराच्या कम्पाउंडला कुलूप लावलेले होते. ते उघडल्यावर आतमध्ये गेले असता, मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी तुटलेली होती. घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. कपाटातील ड्रावर पलंगावर ठेवले होते. त्यातील ४० हजार रुपये रोख, १२ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी चैनल पेंडल, सहा हजार रुपये किमतीच्या ५ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, ५ ग्रॅमची अंगठी असा ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सहायक फौजदार अतुल वंजारी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title: Gold, cash stolen from retired teacher's house