शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नळ जोडणीसाठी पुन्हा खड्डे खोदल्यामुळे सर्वसामान्यांना आला वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमृत योजने अंतर्गंत पाईपलाईन टाकण्यासाठी काही महिन्यांपूर्वी खड्डे खोदण्यात आल्यानंतर, आता पुन्हा नळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अमृत योजने अंतर्गंत पाईपलाईन टाकण्यासाठी काही महिन्यांपूर्वी खड्डे खोदण्यात आल्यानंतर, आता पुन्हा नळ जोडणीसाठी घरासमोर खड्डे खोदण्यात येत आहेत. खड्डे आणि दगड-गोट्यांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाले असून, अमृतच्या कामाचा अक्षरश : वैताग आला असल्याच्या भावना रिंगरोडवरील रहिवाशांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या रिॲलिटी चेक दरम्यान व्यक्त केल्या. तसेच हे काम करताना मनपातर्फे कुठलेही नियोजन न करण्यात आल्यामुळे नागरिकांमधून मनपाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मनपा प्रशासनाने अमृत अंतर्गंत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे नागरिकांना नळ कनेक्शन देण्यास सुरुवात केली आहे. शहरात सध्या विविध भागात हे काम सुरू आहे. नळ कनेक्शन देण्यासाठी पुन्हा रस्ते खोदण्यात येत आहे. या कामासाठी तीन ते चार फुटांपर्यंत खड्डे खोदण्यात येत असून, संबंधित मक्तेदारातर्फे एका दिवसात हे काम पूर्ण करण्यात येत आहे. सध्या रिंगरोडवर दोन्ही बाजूला हे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या कामामुळे पुन्हा रस्त्याची दुरवस्था होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र, व्यवस्थित दुरुस्ती न केल्यामुळे आजही त्रास सहन करावा लागत आहे. आता पुन्हा नळ जोडणीसाठी खोदाई करण्यात येत असल्यामुळे या कामाचा त्रास आणखी किती दिवस सहन करणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

इन्फो :

तर पाईपलाईन टाकतानाच नळ जोडणी करायला हवी होती

सध्या रिंगरोडवर नळ जोडणीसाठी खड्डे खोदण्यात येत असून, दोन्ही बाजूला प्रत्येक घरासमोर हे खड्डे खोदण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. मनपा प्रशासनाने गेल्या वर्षी अमृतची पाईपलाईन टाकल्यानंतर, त्याचवेळेस नळ जोडणी करायला हवी होती. त्यामुळे पुन्हा रस्ते खोदण्याचा प्रश्न राहिलाच नसता, असा सूर येथील रहिवाशांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

अमृतची पाईप लाईन टाकल्यानंतर आता नळजोडणी करण्यात येत आहे. नळ जोडणीसाठी खड्डे खोदून तत्काळ बुजविण्यात येत आहे. संपूर्ण शहरात हे काम केले जात आहे.

आकाश दुबे, पर्यवेक्षक.

::

इन्फो :

नळजोडणीसाठी पुन्हा खड्डे खोदण्यात येत असल्यामुळे, रस्त्याची पुन्हा दुरवस्था होत आहे. मनपाने पाईपलाईन टाकतानाच नागरिकांना या ठिकाणी नळ कनेक्शन द्यायला हवे होते. ज्यामुळे पुन्हा रस्ता खोदावा लागला नसता.

सुरेश पाटील, रहिवासी.

इन्फो :

अमृतसाठी करण्यात येणाऱ्या खोदाईला विरोध नाही. मात्र, खड्डे खोदल्यानंतर ते व्यवस्थित रित्या बुजविले जात नाही. रस्ता खालीवर होऊन, अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.

नितीन मा‌ळी, व्यावसायिक