१५ तालुक्यांचे भवितव्य धोक्यात

By Admin | Updated: January 28, 2015 13:47 IST2015-01-28T13:47:07+5:302015-01-28T13:47:07+5:30

: केंद्र सरकारच्या पार-तापी-नर्मदा लिंक योजना तयार करून नार-पार खोर्‍यातील ३२ टी.एम.सी. पाणी दक्षिण गुजरातनजीक सौराष्ट्र व कच्छ भागात नेण्याचे नियोजन सुरू आहे.

Future of 15 talukas threat | १५ तालुक्यांचे भवितव्य धोक्यात

१५ तालुक्यांचे भवितव्य धोक्यात

जळगाव : केंद्र सरकारच्या पार-तापी-नर्मदा लिंक योजना तयार करून नार-पार खोर्‍यातील ३२ टी.एम.सी. पाणी दक्षिण गुजरातनजीक सौराष्ट्र व कच्छ भागात नेण्याचे नियोजन सुरू आहे. तसे झाले तर १५ तालुक्यांचे भवितव्य धोक्यात येईल. याविरोधात २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे, अशी माहिती अँड. विश्‍वासराव भोसले यांनी पत्रपरिषदेत दिली. 
ते म्हणाले, की ७ जानेवारीला मुंबईत केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात गिरणा नदीवर असलेल्या नार-पार खोर्‍यातील पाणी गुजराकडे वळविण्याबाबत विचार झाला आहे. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Future of 15 talukas threat