जळगाव जिल्ह्यात ४० वर्षाखालील चौघांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:13 IST2021-04-03T04:13:42+5:302021-04-03T04:13:42+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसरा्या लाटेत सर्वच वयोगट बाधित व गंभीर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ...

Four persons under 40 years of age died in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात ४० वर्षाखालील चौघांचे मृत्यू

जळगाव जिल्ह्यात ४० वर्षाखालील चौघांचे मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या दुसरा्या लाटेत सर्वच वयोगट बाधित व गंभीर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील तरूणांचे मृत्यू थांबत नसल्याचे गंभीर चित्र कायम आहे. शुक्रवारी जळगाव शहरातील २२ वर्षीय तरूणीसह जिल्ह्यातील ४० वर्षाखालील ४ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात पंधरा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हे मृत्यू रोखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात गेल्या महिनाभरात प्रथमच नवे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक असे चित्र होते. जिल्ह्यात ११४२ नवे रुग्ण आढळून आले असून १२२२ रुग्ण बरे झाले आहेत. एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा हा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. मृतांमध्ये जळगाव शहरातील ६, भुसावळ ५, अमळनेर ३ तर धरणगाव तालुक्यातील एका बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे.

Web Title: Four persons under 40 years of age died in Jalgaon district