पारोळ्याची देवयानी माळी चित्रकला स्पर्धेत राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST2021-08-27T04:20:01+5:302021-08-27T04:20:01+5:30

पारोळा : येथील बालाजी प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी देवयानी चंद्रकांत माळी (इयत्ता दुसरी) ही प्रथम गटात राज्यातून प्रथम ...

First in the state in Parola's Devyani Mali Painting Competition | पारोळ्याची देवयानी माळी चित्रकला स्पर्धेत राज्यात प्रथम

पारोळ्याची देवयानी माळी चित्रकला स्पर्धेत राज्यात प्रथम

पारोळा : येथील बालाजी प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी देवयानी चंद्रकांत माळी (इयत्ता दुसरी) ही प्रथम गटात राज्यातून प्रथम आली.

तिच्या यशाबद्दल अध्यक्ष उमेश करोडपती, सचिव डॉ. सचिन बडगुजर, मुख्याध्यापक हेमंतकुमार बी. पाटील, विजय बडगुजर आदींनी अभिनंदन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शिक्षक सेनेच्यावतीने नितीन बानगुडे पाटील व शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा व कोल्हापूर या जिल्ह्याच्या वतीने ही राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती.

या विद्यार्थिनीला राज्यस्तरीय पारितोषिक प्रमाणपत्र, ५०१ रूपये रोख बक्षीस शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, शिक्षक सेना तालुकाध्यक्ष अनिल चौधरी, बापू महाजन, विक्रांत पाटील , मनवंत साळुंखे, लक्ष्मीकांत पाटील, धनेश पाठक यांनी घरी जाऊन देवयानी चंद्रकांत माळी या विद्यार्थिनीचा सत्कार केला. यावेळी तिचे आई-वडील उपस्थित होते.

Web Title: First in the state in Parola's Devyani Mali Painting Competition