शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

नाटकाच्या पहिल्याच प्रयोगात ‘वादाची घंटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 01:08 IST

अमळनेर : अखेर नाटय़गृहाचा पडदा उघडला, पहिल्या प्रयोगाला रसिकांची ब:यापैकी उपस्थिती, दर्जेदार नाटके येतील अशी अपेक्षा

अमळनेर  : अमळनेरची ओळख प्रतिपंढरपूरप्रमाणेच नाटय़पंढरी म्हणूनही आहे. येथे उभारण्यात आलेले नाटय़गृह रसिकांच्या सेवेत कधी रुजू होते याची प्रतीक्षा लागून होती. अखेर ती प्रतीक्षा आज संपली. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहाचा पडदा रात्री 9 वाजता उघडला. पहिलाच प्रयोग ‘युगपुरुष, महात्मांचे महात्मा’ हा झाला. या प्रयोगाला रसिकांचा ब:यापैकी  प्रतिसाद मिळाला. मात्र या पहिल्याच प्रयोगात शाब्दिक वादाची घंटी वाजल्याने रसिकांनी आश्चर्य व्यक्त केले.अमळनेरकर रसिकांना नाटकांची असलेली आवड, त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन, येथेही नाटय़गृह उभारणीसाठी प्रय} सुरू झाले. शहराच्या मध्यवर्ती भागात  नाटय़गृहासाठी जागा मिळाली. हे नाटय़गृह जवळपास 1300 आसनांचे आहे. जळगाव, धुळे येथील नाटय़गृहापेक्षाही हे नाटय़गृह मोठे आहे. हे नाटय़गृह वातानुकूलित आहे. नाटय़गृहाच्या उभारणीसाठी अनेकांचा हातभार लागला. ब:याच कालावधीनंतर नाटय़गृहाचे काम पूर्ण झाले. नाटय़गृह पूर्ण झाले, मात्र नाटकाची पहिली घंटा कधी वाजणार याची रसिकांना प्रतीक्षा लागून होती. अखेर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला नाटय़गृहाचा ‘पडदा’ उघडला. पहिलाच प्रयोग  रामचंद्र मिशन धरमपूर प्रस्तुत ‘युगपुरुष, महात्मांचे महात्मा’ याचा झाला. नाटक सुरू होण्यापूर्वी स्थानिक कलाकार अभिजित मगरे, भाग्यश्री पाटील, प्रकाश पाटील यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते नाटय़प्रयोगाचे उद्घाटन झाले. या वेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, बांधकाम सभापती मनोज पाटील, मोरया नाटय़ संस्थेचे अध्यक्ष संदीप घोरपडे, चेतन सोनार, राजेश पाटील, महेंद्र पाटील, महेश पाटील, चेतन शहा, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकूळ पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.दरम्यान, नाटक सुरू होण्यापूर्वी ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.1 अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांचे नाटक सुरू होण्यापूर्वी शाब्दिक वाद झाला. नगरसेवक मनोज पाटील भाषण करीत असताना, संदीप घोरपडे उभे राहून म्हणाले की, शहराची दिशाभूल करू नका. ज्यांनी प्रय} केले, त्यांचे नाव न घेता इतरांचे नाव घेतले. तेव्हा मनोज पाटील म्हणाले, राजकारण करू नका.2 वाद वाढू नये म्हणून मान्यवर व्यासपीठावरून खाली उतरले. फक्त आमदार थांबले. त्यांनी माईक हातात घेऊन सांगितले की, मी आलो तेव्हा हे नाटय़गृह अपूर्ण होते. संदीप घोरपडे यांनी मला लक्ष द्यायला सांगितले. मी पाच कोटींचा निधी आणला तेव्हा नाटय़गृह पूर्ण झाले.