चाऱ्या व्यवस्थित बुजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST2021-02-05T05:54:43+5:302021-02-05T05:54:43+5:30

डांबरीकरण करा जळगाव : गणेश कॉलनीत अमृत योजनेच्या कामानिमित्त ठिकठिकाणी खोदलेल्या चाऱ्या बुजविण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर अद्याप खडी ...

Feed the fodder properly | चाऱ्या व्यवस्थित बुजवा

चाऱ्या व्यवस्थित बुजवा

डांबरीकरण करा

जळगाव : गणेश कॉलनीत अमृत योजनेच्या कामानिमित्त ठिकठिकाणी खोदलेल्या चाऱ्या बुजविण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर अद्याप खडी पडलेली आहे. या खडीवरून घसरून अनेक छोटे-मोठे अपघात होत असतात. मात्र त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.

दुभाजक स्वच्छ करा

जळगाव : विविध रस्त्यांवर मनपाने वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी दुभाजक उभारले आहेत. मात्र, या दुभाजकांमध्ये प्रचंड कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या साचल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. सौंदर्यीकरणही नष्ट होत आहे. दुभाजक स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

कुत्र्यांचा त्रास कायम

जळगाव : मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना चावा घेण्याच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडत आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत अनेक वेळा महासभा व स्थायी सभेत आवाज उठवूनही प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आलेली नाही. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

रोजगाराची प्रतीक्षा

जळगाव : कोरोनामुळे अनेक व्यवसाय, उद्योगांवर परिणाम झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले. अनेकांच्या हातचे काम गेले. आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊन बहुतांश व्यवहार सुरळीत होत असल्याने बेरोजगारांना रोजगार मिळण्याची प्रतीक्षा लागली आहे.

Web Title: Feed the fodder properly