Farooq Shaikh as state president of Maniar community | मनियार बिरादरीच्या राज्य अध्यक्षपदी फारुक शेख
मनियार बिरादरीच्या राज्य अध्यक्षपदी फारुक शेख

जळगाव : महाराष्ट्र राज्याच्या मनियार बिरादरीचे अधिवेशन इदगाह मैदानावरील सभागृहात झाले. या अधिवेशनामध्ये मनियार बिरादरीच्या राज्य अध्यक्षपदी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांची तर सचिवपदी जळगावचेच डॉ. अल्तमश शेख सर्वानुमते निवड करण्यात आली. बलात्कार सारख्या घटना आटोक्यात आणण्यासाठी कडक कायदा करून आरोपींना जामीन मिळू नये यासह विविध १० ठराव अधिवेशनात करण्यात आले.
अधिवेशनाची सुरुवात मुफ्ती अतिकउर रहमान, दारूल कजाचे प्रमुख यांच्या पवित्र कुराण पठणाने झाली.
अश्फाक खान, लियाकत अली, जाकीर मन्यार, अजिज शेख, शेख मन्नान, वकार खान, इक्बाल खान, रफिक मणियार, समीर बशीर, डॉ. मोहम्मद सलीम, शब्बीर अहमद, मोहम्मद साकिब, अब्दुल बारी अब्दुल समद, हकीम चौधरी, अब्दुल नासीर, शेख असलम, आरिफ खान, रफिक मेहबूब, जावेद गुलाम, जमिल इंजिनियर, शफी मंडपवाले, जाकीर हाजी, जुबेर अहमद, डॉ. अल्तमश, डॉ. फारुक साबीर, डॉ. रईस कासार, सोहेल खान, युनुस शेख, नासीर खान यांनी चर्चेत सहभाग घेतला. सांगता सिल्लोडचे उमर फारूक यांच्या दुआने झाली.
कार्यकारिणी याप्रमाणे - उपाध्यक्ष - मन्नान शेख (जालना) मुश्ताक शेख (मुंबई), खजिनदार - जावेद गुलाम (नाशिक), कार्याध्यक्ष - अब्दुल बारी (नंदुरबार), सहसचिव आरिफ शेख (सोनगीर), इक्बाल शेख (मलकापूर), प्रादेशिक अध्यक्ष म्हणून मुंबई विभाग - रफिक मणियार ,पश्चिम महाराष्ट्र - डॉ. सलीम शेख (धुळे), प्रादेशिक सचिव म्हणून मुंबई - अब्दुल वहाब शेख (ठाणे), पश्चिम महाराष्ट्र - वकार शेख (नंदुरबार), संचालक - सय्यद मुस्ताक (बुलडाणा), एजाज मोहम्मद गौस (अहमदनगर), जाकीर मोहम्मद (शहादा), साबीर शेख (भुसावळ), वित्तीय समिती अध्यक्ष - सलीम शेख (भुसावळ) यांची निवड करण्यात आली.

Web Title:  Farooq Shaikh as state president of Maniar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.